For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for डेल्टा एर लाइन्स.

डेल्टा एर लाइन्स

डेल्टा एर लाइन्स
आय.ए.टी.ए.
DL
आय.सी.ए.ओ.
DAL
कॉलसाईन
डेल्टा
स्थापना जून १७, इ.स. १९२९
हब अटलांटा, न्यू यॉर्क-जेएफके, ॲम्स्टरडॅम, सिनसिनाटी, डीट्रॉईट, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, मिनीयापोलिस-सेंट पॉल
मुख्य शहरे मेम्फिस, टोक्यो, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, सॉल्ट लेक सिटी
फ्रिक्वेंट फ्लायर स्कायमाइल्स
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या ७२२
मुख्यालय अटलांटा
प्रमुख व्यक्ती एड बास्टियान (मुख्याधिकारी
संकेतस्थळ http://www.delta.com

डेल्टा एर लाइन्स (Delta Air Lines) ही अमेरिकेतील एक आघाडीची विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जगभर विमानसेवा पुरवते. डेल्टा एर लाइन्सचे मुख्यालय जॉर्जिया मधील अटलांटा येथे आहे.[] स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कंपनीची सहा खंडामधून मोठया प्रमाणावर विमानवाहतूक सेवा कार्यान्वित आहे. ८०,००० पेक्षा जास्त कामगार वर्ग आणि दैनंदिन ५००० उड्डाणे करत असलेली ही सर्वांत मोठी विमानप्रवासी कंपनी आहे.[] या कंपनीच्या विमानांचे विश्रांतिस्थळ हर्टजफिल्ड येथील जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून जगामधील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वांत व्यस्त ( वार्षिक ९१ अब्ज पेक्षा जास्त प्रवासी ) व या कंपनीच्या विमानांचे तांत्रिक दुरूस्ती केंद्र म्हणून ओळखले जाते.[] ही विमानकंपनी सर्वांत जुनी विमानकंपनी असून स्थापना केल्यापासून ६ व्या क्रमांकावर आहे. २०११ मध्ये विमांनाच्या ताफ्याच्या [] व २०१२ मध्ये प्रवाशांच्या [] तुलनेत जगामधील सर्वांत मोठी कंपनी आहे.

इतिहास

[संपादन]

डेल्टा एर लाइन्स कंपनीने ३० मे, १९२४ रोजी जॉर्जिया मधील मेकॉन येथे पिकांवर फवारणी करण्यासाठी पहिले विमान वापरले. १९२५ मध्ये ही कंपनी लुईसिना मन्रेा येथे स्थलांतरित झाली. कंपनीचे मूळ संस्थापक , कॉलेट वुलमन यांनी १३ सप्टेंबर, १९२८ रोजी ही कंपनी विकत घेतली आणि त्याचे ‘डेल्टा एर सर्विस’ असे नामकरण केले. १९२९ च्या सुमारास प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली. दक्षिणपूर्वेकडील राज्यामधून एका प्रवाशाच्या वाहतुकीने पहिला मार्ग सुरू झाला.[] त्यानंतर या कंपनीने अनेक विमानवाहतूक कंपन्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. १९६० मध्ये जेट विमानांचा वापर केला आणि १९७० मध्ये युरोपपर्यंत आणि १९८० मध्ये पॅसिफिकपर्यंत मजल मारत आंतराराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपली घोडदौड कायम ठेवली.

पूर्वीचा इतिहास

[संपादन]

८० वर्षांपासून अस्तित्वात असलेली सध्याची डेल्टा एर लाइन्स ही कंपनी अनेक विमान वाहतूक कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे बनलेली आहे. अलीकडेच २९ ऑक्टोबर, २००८ मध्ये नॉर्थवेस्ट एरलाइन्स बरोबर झालेल्या एकत्रीकरणामुळे जगातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी म्हणून या कंपनीचा लौकिक आहे. सुरुवातीच्या काळात एकत्रीकरण झाले तरी नॉर्थवेस्टच्या नावाने विमान वाहतूक कंपनीचे व्यवहार चालत होते. परंतु ३१ जानेवारी, २०१० मध्ये आरक्षण पद्धती आणि वेबसाईट इत्यादींचे एकत्रीकरण झाल्यानंतर नॉर्थवेस्ट व्यवहारामधून अधिकृतरीत्या सेवानिवृत्त झाली आणि डेल्टा एर लाइन्स या नावांने विमानवाहतूक सुरू राहिली.[][]

मुख्यालय आणि कार्यालय

[संपादन]
डेल्टाचे मुख्यालय अटलांटा शहर


१९४१ पासून अटलांटा शहराच्या उत्तरेकडे व्यापारी संकुलामध्ये हर्टजफिल्ड – जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ या कंपनीचे मुख्यालय आहे. [][१०]

ठाणी

[संपादन]

डेल्टाची सात अंतर्देशीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ठाणी आहेत.[११]

पूर्वीची ठाणी

[संपादन]

पूर्वीची दुय्यम ठाणी

[संपादन]

कामगार वर्ग

[संपादन]

या मुख्य आणि भागीदारी कंपनीमध्ये अंदाजित ८०,००० कामगार आहेत.[] १२,००० इतकी वैमानिकांची संख्या असलेली ही एकमेव कंपनी आहे. युनायटेड स्टेटसमधील वैमानिक संख्या, विमानांचे उड्डाण या व्यतिरिक्त इतर सर्वच बाबतीत डेल्टा सर्वांत मोठी विमान कपंनी आहे. नॉर्थवेस्ट विमान वाहतूक कंपनीसोबत एकत्रीकरण झाल्यानंतर तेथील कामगारांचे विलीनीकरण झाल्यामुळे कामगारांच्या बढती, वेतन, ज्येष्ठता इत्यादींविषयी बरेच प्रश्न उभे राहिले होते. त्यांना सामावून घेणे, नव्याने वेतन ठरविणे, कामाचे व्यवस्थापन इत्यादींबाबतीत नियम ठरविणे आवश्यक होते. त्यानुसार कामगार वर्गाचे संघटन करून त्याबाबत निर्णय घेण्याचे काम चालू आहे.

विमानसेवा

[संपादन]

६ खंडामध्ये ४९३२ उड्डांणाद्वारे आणि २५३३ रोजच्या फेऱ्यांद्वारे डेल्टा एर लाइन्सची विमाने प्रवाशांना विमान सेवा देत आहेत.[]

तळांची सांख्यिकी

[संपादन]
श्रेणी विमानतळ दैनंदिन फे-या अंतर
अटलांटा (एटीएल) ९६० २१६
डेट्रॉईट (डीटीडब्ल्यू) ४५० १३२
मिनेपोलिस- सेंट पॉल (एमएसपी) ४१० १३६
न्यू यॉर्क सिटी (एलजीए) २६८ ६३
सॉल्ट लेक सिटी (एसएलसी) २४३ ८६
न्यू यॉर्क सिटी (जेएफके) १४३ ७८
सिनसिनाटी/ उत्तर केंटकी (सीव्हीजी) १०१ ४२
पॅरिस (सीडीजी) २४ १९
ॲमस्टरडॅम (एएमएस) २३ २०
१० टोकीयो (एनआरटी) २२ १९

जोडीदार

[संपादन]

उड्डाण

[संपादन]

जानेवारी २०१३ पर्यंत डेल्टा कडून एरबस, बोइंग आणि मॅकडोनेल डग्लस यांचेकडून बनविण्यात आलेल्या ७०० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण केले होते. इतर यू.एस.विमानवाहतूक कंपनीच्या मानाने बोइंग ७५७, बोइंग ७६७, आणि एरबस ए३३० विमानांची वाहतूक जास्त होते. जगामध्ये मॅकडोनेल डग्लस एमडी – ८८ आणि मॅकडोनेल डग्लस एमडी-९० या विमानांची वाहतूक जास्त होते.

केबीन

[संपादन]

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी वर्गासाठी बोइंग ७७७ – २०० एल आर सारख्या विमानांमध्ये डेल्टाकडून बिझनेस एलाईट कक्ष तयार केलेले आहे. हा विशेष वर्ग असल्यामुळे यामध्ये जेवण, नाश्ता, मदय आणि इतर सुविधा पुरविलेल्या आहेत.

याव्यतिरिक्त प्रथम वर्ग व्यापारी वर्ग, इकॉनॉमी कम्फर्ट क्लास आणि इकॉनॉमी क्लास या विमानकंपनीकडून पुरविलेल्या आहेत.

सुविधा

[संपादन]

वाय फाय, पॅनासोनिक इएफएक्स ऑडिओ व्हिडिओ सारख्या अत्याधुनिक सोशल नेटवर्किंग सुविधा मागणीनुसार वरील सर्व क्लासमध्ये पुरविल्या जातात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फेडरल एव्हिऐशन ॲडमिनिस्ट्रेशन- एरलाइन सर्टीफिकेट इनफॉर्मेशन-डिटेल व्हिव" (इंग्लिश भाषेत). 2021-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b c "डेल्टा स्टेट अँड फॅक्टस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "डेल्टा टेकओप्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "जगातील दहावी विमानवाहतूक कंपनी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "प्रवासांना विमान वाहतूक सेवा" (इंग्लिश भाषेत). 2017-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "डेल्टा एर लाइन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "डेल्टा विमान वाहतुकीचे काम कराण्यासाठी प्रमाणपत्र मिळविण्यात यशस्वी" (इंग्लिश भाषेत). |first= missing |last= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "डेल्टा नॉर्थवेस्ट यांच्या एकत्रिकरणाचा निर्णय" (इंग्लिश भाषेत). |first= missing |last= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "डेल्टामध्ये झालेला गोंधळ" (इंग्लिश भाषेत). |first= missing |last= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "कॉन्टॅक् कोर्पोरेट" (इंग्लिश भाषेत). |first= missing |last= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "डेल्टा एर लाइन्स" (इंग्लिश भाषेत). 2014-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
डेल्टा एर लाइन्स
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?