For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for केन्या एरवेझ.

केन्या एरवेझ

केन्या एरवेझ
आय.ए.टी.ए.
KQ
आय.सी.ए.ओ.
KQA
कॉलसाईन
KENYA
स्थापना २२ जानेवारी १९७७
हब जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (नैरोबी)
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लाइंग ब्ल्यू
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या ४३
ब्रीदवाक्य The Pride of Africa
मुख्यालय नैरोबी, केन्या
संकेतस्थळ kenya-airways.com
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळाकडे निघालेले केन्या एरवेझचे बोइंग ७७७ विमान

केन्या एरवेझ (इंग्लिश: Kenya Airways) ही आफ्रिकेच्या केन्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या केन्या एरवेझचे मुख्यालय नैरोबी येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ नैरोबीच्या जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. १९९६ साली खाजगीकरण झालेली केन्या एरवेझ ही आफ्रिकेमधील पहिलीच कंपनी होती.

प्रिल १९९५पर्यंत कंपनीची संपूर्ण मालकी सरकारकडे होती. १९९६मध्ये तिचे खाजगीकरण करण्यात आले जी पहिली अशी आफ्रिकन कंपनी होती जिचे खाजगीकरण यशस्वी झाले. केन्या एरवेझ सध्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर चालवली जाते. त्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा केन्या सरकारचा (२९.८%) असून त्यानंतर केएलएमचा (२६.७३%) आहे. उरलेले शेअर्स इतर खाजगी मालकांचे आहेत. २०१० सालापासून केन्या एरवेझ स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

जानेवारी २०१३ला केन्या एरवेझ सहारन क्षेत्रातील आघाडीची विमानवाहतूक कंपनी होती.[] आफ्रिकन विमानकंपन्यांमध्ये आसन क्षमतेनुसार केन्या एरवेझचा चौथा क्रमांक लागत होता.[] ही कंपनी जून २०१० मध्ये स्काय टीमची पूर्ण सभासद झाली तसेच १९७७ पासून ती आफ्रिकन एरलाईनची सभासद आहे.[]

इतिहास

[संपादन]

केन्या एरवेझची स्थापना केन्या सरकारने २२ जानेवारी १९७७ मध्ये केली होती.[] ४ फेब्रुवारी १९७७[१५] मध्ये ब्रिटिश मिडलॅंड एरवेझ कंपनीकडून दोन बोईंग ७०७ विमाने भाड्याने घेऊन नैरोबी-फ्रॅंकफर्ट-लंडन या मार्गे सेवेला प्रारंभ करण्यात आला.[१६] १९७७ च्या उत्तरार्धात ३ बोईंग ७०७ विमाने नॉर्थवेस्ट ओरीएंट कडून घेण्यात आली.[१९] पुढच्या वर्षी कंपनीने एक चार्टर उपकंपनी सुरू केली जी मुख्य कंपनीकडून भाड्याने विमाने घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवासी तसेच मालाची वाहतूक करत होती.

जुलै १९८०मध्ये कंपनीचे २,१०० कर्मचारी , ३ बोईंग ७०७ मध्ये, १ बोईंग ७२०, १ डीसी ९-३० आणि ३ फोक्कर एफ-२७ होते.

१९८२मध्ये नैरोबी-मुंबई विना थांबा सेवा सुरू करण्यात आली.[] एक वर्षानंतर कंपनीची टांझानियासाठीची सेवा सुरू झाली.

१९८६मध्ये केन्याच्या सरकारने देशाच्या आर्थिक विकास आणि वृद्धीची गरज व्यक्त केली. त्यावेळी सरकारने कंपनीचे हित खाजगीकरण करण्यातच असल्याचे सूचित केले आणि कंपनीच्या खाजगीकरणाचा पहिला प्रयत्न करण्यात आला. १९९३-१९९४ च्या वर्षी व्यापारीकरणानंतर पहिल्यांदा कंपनीला नफा झाला.[३२] १९९४मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेला खाजगीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आले.[३३] जानेवारी २००० मध्ये, कंपनीने पहिला अपघात अनुभवला जेव्हा १९८६मध्ये नवीन विकत घेतलेले एरबस A३१० विमान अब्दिजानहून उड्डाण घेतल्यावर आयवरी कोस्ट येथे कोसळले.[] २००० साली कंपनीचे २,७८० कर्मचारी होते. २००२ मध्ये अजून ३ बोईंग विमानांची ऑर्डर देण्यात आली. तसेच या प्रकारचे आणखी एक विमान नोव्हेंबर २००५मध्ये घेण्यात आले. मार्च २००६ मध्ये ६ बोईंग ७८७ विमाने घेण्यात आली.[४२]

जून २०१२मध्ये आणखी पैसा उभा करण्यासाठी कंपनीने २० बिलियन केनियन शिलिंग एवढ्या मूल्याचे मालकी हक्क विक्रीसाठी उपलब्ध केले.[४४][४५][४६] यातून झालेल्या शेअर्स विभागणी नंतर केएलएमचा हिस्सा २६% वरून २६.७३% वर आला, तसेच केनियन सरकारचा हिस्सा २३% वरून २९.८% होऊन ते सगळ्यात मोठे हिस्सेदार झाले.[]

कॉर्पोरेट व्यवहार

[संपादन]

सहाय्यक आणि सहकारी कंपन्या

[संपादन]

स्वस्त दराची सेवा देणारी जंबोजेट, जिची स्थापना २०१३ मध्ये झाली आणि आफ्रिकन कार्गो हॅंडलिंग लि. या केन्या एरवेझची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपन्या आहेत. इतर कंपन्या ज्यात केन्या एरवेझची हिस्सेदारी आहे त्यात केन्या एरफ्रेट हॅंडलिंग लि.(५१%) आणि टांझानिअन कॅरिअर प्रेसिजन एर (४१.२३%)चा समावेश होतो.[]

महत्त्वाचे लोक

[संपादन]

जुलै २०१६ नुसार, डेनिस अवोरी हे कंपनीचे चेरमन आहेत. जुलै २०१७ नुसार, सेबेस्टीअन मिकोझ हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मिकोझ त्याआधी एलओटी पोलिश एरलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यांनी १ जून २०१७ला येथील कारभार हाती घेतला.[]

भविष्यातील योजना

[संपादन]

एप्रिल २०१२मध्ये कंपनीने प्रोजेक्ट माविंगु नावाची योजना घोषित केली ज्यानुसार २०२१ पर्यंत २४ नवीन गंतव्यस्थाने सुरू करण्याचे उद्दिष्ट्य आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये कंपनीने दरवर्षी ६ नवीन मार्ग सुरू करणार असल्याचे घोषित केले.[१०]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Ethiopian Airlines distinguished with African Cargo Airline Award". 2012-06-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Kenya Airways and Ethiopian Airways compete for Nairobi and Addis hub power as Gulf carriers expand".
  3. ^ "Kenya Airways History". 2016-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-24 रोजी पाहिले.
  4. ^ "World airline directory - Kenya Airways".
  5. ^ "Kenya Airways International Flights Connectivity and Fleet Information". 2018-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-24 रोजी पाहिले.
  6. ^ "Kenyan plane crashes into sea".
  7. ^ "Government now largest shareholder of Kenya Airways". 2012-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-24 रोजी पाहिले.
  8. ^ "Annual Reports & Financial Statements 2013".
  9. ^ "Kenya Airways announces new CEO".
  10. ^ "ROUTES: Kenya Airways plans global network over 10 years".

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
केन्या एरवेझ
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?