विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- समसमीक्षा विनंती पृष्ठ
- समसमीक्षित बावन्नकशी लेख
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
मराठी विकिपिडीयामध्ये २०१० या वर्षात किमान २५०० मौलिक लेखांची भर घालणे हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. एका वर्षातील प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे एका सदस्याने एकुण ५२ मौलिक लेखांची भर घालणे आणि अश्या किमान ५२ समविचारी सदस्यांनी मिळून एका वर्षात २५०० लेखांचा आकडा गाठणे हे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप राहील.
जे सदस्य आठवड्याला एक लेख हे बंधन पाळू शकत नाहीत तेही या प्रकल्पात सामिल होऊ शकतात. किमान एक ते जास्तीत जास्त कितीही लेख एक सदस्य लिहू शकतो. लेखांचा दर्जा हे मुख्य मानक असून बावन्नकशी हे नाव फक्त सुचक आहे.
मराठी विकिपिडीयामध्ये भर घालण्यासाठी जाणीवपुर्वक सामुहिक प्रयत्न करणे हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे. जाणकारांनी या प्रकल्पात सहभागी होऊन आपल्या मातृभाषेतील हा विश्वकोश अधिक सन्माननीय करण्यात हातभार लावावा ही विनंती. इच्छूक सदस्यांनी आपल्या नावांची खालील यादीत नोंद करावी. चर्चा पानावर आपली मते, सुचना, व दुरुस्त्या मांडाव्यात.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
समसमीक्षा
[संपादन]या प्रकल्पातील लेखांचे समसमिक्षण सदस्यांद्वारा समसमीक्षा पृष्ठ येथे केल्या जावे. समसमिक्षीत लेखांची यादी समसमीक्षित बावन्नकशी लेख इथे नोंदवावी.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.