For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for कान्होजी आंग्रे.

कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे
१६ व्या शतकातील मराठा आरमाराध्यक्ष.
जन्म इ.स. १६६९
हर्णे, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू जुलै ४, इ.स. १७२९
कुलाबा किल्ला, अलिबाग, महाराष्ट्र, भारत.
टोपणनावे सरखेल
पदवी हुद्दा आरमार प्रमुख
कार्यकाळ १६९८ - १७२९


सरखेल कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ - ४ जुलै, १७२९) हे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते.[ संदर्भ हवा ] कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला.[ संदर्भ हवा ] इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नांनंतरही, कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यू पर्यंत मराठा आरमार अजिंक्य राहिले.

आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ (मराठा) कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेवू.[ संदर्भ हवा ] त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते.[ संदर्भ हवा ] कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये कोल्हापूरचे भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, (संदर्भ - कान्होजी आंग्रे (चरित्र, लेखक पु.ल.देशपांडे) मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातला जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिला. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.

१७०७ मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू [ संदर्भ हवा ] (तथ्य तपासा ?) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणाऱ्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हणले जाते.

कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

नाविक तळ

[संपादन]
  • १६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. 11 व्या शताकातील शिलाहार घरण्यातील राजा भोज ने बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती.
  • मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.
  • १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. [ संदर्भ हवा ]

मोहिमा

[संपादन]

कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला, आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चांचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.

१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅन्सिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये रॉबर्ट कोवान इंग्लंडला परतले.त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेवून खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.

प्रमुख लढाया

[संपादन]
  • १७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
  • १७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
  • १७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा.
  • १७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
  • १७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
  • १७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
  • १७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
  • १७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
  • १७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल.
  • १७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.[ संदर्भ हवा ]

मृत्यू

[संपादन]
अलीबाग येथील कान्होजी आंग्रे यांची समाधी

४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यांची समाधी तथा छत्री अलिबाग येथे उभारण्यात आली आहे.

आंग्र्यांच्ये मृत्युवेळी सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. कान्होींच्या मृत्युनंतर त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली. त्यांना कान्होजींसारखे यश मिळाले नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरुवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आले.

वारसा

[संपादन]

कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावला... [ व्यक्तिगतमत ]साचा:अविश्वकोशीय उल्लेख

वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या आरमाराचे व सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.{ref कान्होजी आंग्रे (लेखक पु.ल.देशपांडे )) त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.[ व्यक्तिगतमत ] आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.[ संदर्भ हवा ]

अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.

विशेष नोंदी

[संपादन]
  • १५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय.एन.एस आंग्रे असे करण्यात आले. कान्होजी आंग्रे यांच्या निर्विवाद कर्तृत्वाचा हा मानबिन्दू आहे. दक्षिण मुंबईतील ओल्ड बॉंबे कॅसल येथील नौदलाच्या आवारात कान्होजी आंग्ऱ्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
  • एप्रिल १९९९ मध्ये भारतीय टपाल खात्याने कान्होजी आंग्रेंवर एक तीन रुपयांचे तिकीट जारी केले. त्यात कान्होजी आंग्ऱ्यांच्या काळातील एका जंगी जहाजाचे चित्र आहे.
  • खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायजर्सच्या निवासी कॉलनीचे नाव सरखेल कान्होजी आंग्रे नगर असे ठेवण्यात आले आहे.
  • २००७ च्या “पायरेट्स ओफ द कॅरीबियन – अ‍ॅट द वर्ल्ड्‌स एन्ड” या इंग्रजी चित्रपटात “श्री संभाजी आंग्रिया” हे नऊ कुप्रसिद्ध सागरी चाच्यांपैकी एक दाखवले आहेत. कान्होजी आंग्रेवरूनच हे नाव त्यांनी उचलले असेल यात शंकाच नाही..[ व्यक्तिगतमत ]

ललित साहित्यातील उल्लेख

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
कान्होजी आंग्रे
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?