हेमा मालिनी
हेमा मालिनी | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे २०१४ | |
मागील | जयंत चौधरी |
---|---|
जन्म | १६ ऑक्टोबर, १९४८ अम्मनकुडी, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | धर्मेंद्र |
अपत्ये | इशा देओल, आहना देओल |
धर्म | [हिंदू धर्म ] |
हेमा मालिनी (१६ ऑक्टोबर, इ.स. १९४८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहे. १९६८ सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. १९७० च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. १९७२ सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
१९८० साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. इ.स. २००० मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला. फेब्रुवारी २००४ मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आली.
हेमा मालिनीचे चरित्रग्रंथ
[संपादन]- Hema Malini: Beyond the Dream Girl (इंग्रजी, लेखक : राम कमल मुखर्जी)
- Hema Malini: An Authorised Biography (इंग्रजी, लेखिका : भावना सोमय्या)
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील हेमा मालिनी चे पान (इंग्लिश मजकूर)
सर्वोत्तम अभिनेत्री श्रेणीतील फिल्मफेर पुरस्कार | |
---|---|
१९५४ -१९६० | मीना कुमारी (१९५४) • मीना कुमारी (१९५५) • कामिनी कौशल (१९५६) • नूतन (१९५७) • नर्गिस (१९५८) • वैजयंतीमाला (१९५९) • नूतन (१९६०) |
१९६१ -१९८० | बिना रॉय (१९६१ ) • वैजयंतीमाला (१९६२) • मीना कुमारी (१९६३) • नूतन (१९६४) • वैजयंतीमाला (१९६५ ) • मीना कुमारी (१९६६ ) • वहिदा रेहमान (१९६७ ) • नूतन (१९६८) • वहिदा रेहमान (१९६९ ) • शर्मिला टागोर (१९७०) • मुमताज (१९७१) • आशा पारेख (१९७२) • हेमा मालिनी (१९७३) • डिंपल कापडिया आणि जया बच्चन (१९७४) • जया बच्चन (१९७५) • लक्ष्मी (१९७६) • राखी (१९७७) • शबाना आझमी (१९७८) • नूतन (१९७९ ) • जया बच्चन (१९८०) |
१९८१ -२००० | रेखा (१९८१) • स्मिता पाटील (१९८२) • पद्मिनी कोल्हापुरे (१९८३) • शबाना आझमी (१९८४) • शबाना आझमी (१९८५) • डिंपल कापडिया (१९८६) • निरंक (१९८७) • निरंक (१९८८) • रेखा (१९८९) • श्रीदेवी (१९९०) • माधुरी दीक्षित (१९९१) • श्रीदेवी (१९९२) • माधुरी दीक्षित (१९९३) • जुही चावला (१९९४) • माधुरी दीक्षित (१९९५) • काजोल (१९९६) • करिश्मा कपूर (१९९७) • माधुरी दीक्षित (१९९८) • काजोल (१९९९) • ऐश्वर्या राय (२०००) |
२००१ – २०२० | करिश्मा कपूर (२००१) • काजोल (२००२) • ऐश्वर्या राय (२००३) • प्रीती झिंटा (२००४) • राणी मुखर्जी (२००५) • राणी मुखर्जी (२००६) • काजोल (२००७) • करीना कपूर (२००८) • प्रियांका चोप्रा (२००९) • विद्या बालन (२०१०) • काजोल (२०११) • विद्या बालन (२०१२) • विद्या बालन (२०१३) • दीपिका पडुकोण (२०१४) • कंगना राणावत (२०१५) • दीपिका पडुकोण (२०१६) • आलिया भट्ट (२०१७) • विद्या बालन (२०१८) • आलिया भट्ट (२०१९) • आलिया भट्ट (२०२०) |
२०२१ – सद्य |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.