For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for सुरगाणा तालुका.

सुरगाणा तालुका

सुरगाणा

२०.५७° उ. ७३.६२° पु.
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग कळवण उपविभाग
मुख्यालय सुरगाणा

क्षेत्रफळ २७४६ कि.मी.²
लोकसंख्या २,०५,१३५ (२०११)
लोकसंख्या घनता ७५/किमी²
शहरी लोकसंख्या ४५२७९
साक्षरता दर ७५%
लिंग गुणोत्तर १०००/९५४ /

प्रमुख शहरे/खेडी बोरगाव, उंबरठाण, बाऱ्हे
तहसीलदार आर. पी. आहेर
लोकसभा मतदारसंघ दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ कळवण विधानसभा मतदारसंघ
आमदार नितीन अर्जुन पवार (२०१९)
पर्जन्यमान १८०८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?

सुरगाणा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.

इतिहास

[संपादन]

सुरगाणा तालुक्याचा इ .स .१७०० सालापासूनचा इतिहास आढळतो. एकेकाळी 'सुरगाणा' हे एक संस्थान होते. या संस्थानाच्या सरहद्दीपासून ५ ते ६ कि. मी. अंतरावर भदर हे आणखी एक छोटे संस्थान होते. तेही सुरगाणा संस्थानच्या अधिपत्याखाली होते. धार संस्थानच्या परमार घराण्यातील राजे श्रीमंत रविराव, शंकरराव, प्रतापराव, यशवंतराव आणि शेवटचे राजे श्रीमंत धेर्यशीलराव पवार हे सुरगाणा संस्थानचे राजे होऊन गेले आहेत, तर देशमुख घराण्यातील श्रीमंत माधवराव खंडेराव देशमुख, यशवंतराव देशमुख, आनंदराव देशमुख, आणि शेवटचे राजे नारायणराव देशमुख हे भदर संस्थानचे राजे होऊन गेले आहेत.

सुरगाणा संस्थानचा 'मोतीबाग राजवाडा' अजूनही अस्तित्वात आहे. या राजवाड्याआधी दुसरा एक मोठा राजवाडा होता. मात्र फार पूर्वी तो जळून खाक झाल्याने हा मोतीबागेतील राजवाडा बांधण्यात आला होता. प्रतापराव देशमुख यांच्या दरबारात एकदा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी एका गायकाने एक गाणे अतिशय सुरात गायले. गाणे ऐकून त्यावेळचे राजे प्रतापराव बेहद्द खुश झाले. छान सुरात गायलांस म्हणून गायकाचे कौतुक केले आणि “निंबारघोडी” ऐवजी “सुरगाणा” अशी संस्थानची नवी ओळख निर्माण केली. सुरगाणा तालुक्यातील सातमाळाच्या रांगांमध्ये "हातगड" किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर त्यांचा पहिला मुक्काम हा "हातगड " किल्ल्यावर होता ,अशी आख्यायिका आहे .

लोकजीवन

[संपादन]

सुरगाणा तालुका हा ९९ टक्के आदिवासी तालुका आहे.. या तालुक्याची भौगोलिक रचना दऱ्याखोऱ्यानी, सह्याद्री पर्वताच्या डोंगर रागांनी वेढलेली आहे. पूर्वी या तालुक्यात घनदाट जंगल होते. सर्वात जास्त पावसाची नोंद या तालुक्यात होत असे. पावसाळ्यात दुथडी भरून, खळखळून वाहणाऱ्या नद्या असलेला हा तालुका २० वर्षांपूर्वी निसर्गसौदर्यांने नटलेला होता परंतु आता अती जंगलतोडीमुळे काही भागातील जंगल संपुष्टात आले आहे आणि त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे तरी आता या भागातील सुशिक्षित तरुणांनी सामोरे येऊन जंगलाचे संरक्षण करावे व परत एकदा याला निसर्गसौंदर्याने सजवावे. तालुक्यात आदिवासींपैकी कोकणा ही जमात बहुसंख्येने आहे. त्याखालोखाल 'हिंदू महादेव कोळी ,वारली ,हरिजन व चारण' आदि जमाती गुण्यागोविंदाने राहत आहे. मराठी ही जरी मातृभाषा असली तरी त्यावर डांंगी व कोकणी या बोलीभाषेचा प्रभाव दिसून येतो. सुरगाणा, उंबरठाण, बोरगाव, बारे या गावात काही प्रमाणात व्यापारीहीहि स्थायिक झाले. पण तरीही शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीतून खरीप हंगामात पिके घेतली जायची. नागली,भात,वरी,वरई, तूर,उडीद व कुळीद ही प्रमुख पिके आहेत. येथील शेती व्यवसाय संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. लोकांना जागेची कमतरता असूनही येथील लोक कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. हे लोक दोन हंगामी उत्पन्ने घेतात.या तालुक्यातील भिंतघर हे गाव "गुलाबी गाव" म्हणून ओळखले जाते. या गावात सगळ्या घराना गुलाबी रंग दिला आहे.ही संकल्पना एका जिल्हा परिषद शिक्षकानी रूचवली.गुलाबी रंगा हा स्री सबलीकणासाठी प्रतीक म्हणून त्यांनी या गावाचे देशांत नाव प्रव्यात आहे.

भूगोल

[संपादन]

नाशिकपासून सुरगाणा ९० कि.मी. अंतरावर आहे. सुरगाणा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २७४६ चौरस किलोमीटर असुन या प्रदेशात १५०० ते २००० मिमी पर्यंत पर्जन्यवृष्टी होते. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची एकूण लोकसंख्या २०५१३५ आहे. सुरगाण्याच्या पूर्वेस कळवण तालुक्याची सीमा, आग्नेयेस दिंडोरी तालुक्याची सीमा तर दक्षिणेस पेठ तालुक्याची सीमा आहे. उत्तरेस व पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. जवळच गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती 'सापुतारा' हे गुजरातच्या डांग जिल्ह्यातील प्रख्यात असे थंड हवेचे ठिकाण आहे. हे पर्यटन स्थळ हे सुरगाण्यापासून अवघ्या १८ कि मी अंतरावर आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरुवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमाळा रांग असे म्हणतात. या सातमाळा रांगेत काही गडकिल्ले आहेत. सुरगाणा तालुक्यातील केम या १५०० मीटर उंचीच्या डोंगरातून नार, पार, गिरणा ह्या प्रमुख नद्या उगम पावतात. बोरगाव पासून सुरू झालेला राज्य महामार्ग क्रमांक २२ गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत जातो. बोरगाव, सुरगाणा व उंबरठाण ही या मार्गावरील प्रमुख गावं आहेत.

पर्यटन

[संपादन]

सुरगाणा तालुक्यातील माणी गावाजवळ बेलबारी तीर्थस्थळ आहे. तेथील माणकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथे महाशिवरात्रीच्या दिवसी यात्रा भरते. पूर्वेला गिरजा मातेचे छोटे पण सुंदर मंदिर असून हजारो भाविक तिचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तालुक्यातील केळावण या गावी असलेला ५०० मीटर उंचीवरून पडणारा धबधबा बघण्यासाठी पर्यटक येत असतात. तालुक्यातील शिंदे या गावाजवळील केम डोंगरावर वर्षातून दोनदा, महाशिवरात्रीला व दीपावलीच्या सणाला यात्रा भरते. येथे महालक्ष्मी देवीचे दुर्मीळ मंदिर आहे.तसेच महाशिवरात्री नंतर होळी साठी सुरगाणा येथे यात्रा भरते. येथे सर्वात जास्त भाविकांची गर्दी असते. तसेच होळी हा सण सुरगाणा तालुक्यातील लोक आवडीने साजरा करतात. बारे येथे जवळच भिवतास धबधबा आहे तो पावसाळयामधे खुप सुन्दर दिसतो.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. अहमदगव्हाण
  2. अलंगुण
  3. आलिवदांड
  4. आंबाठा
  5. आंबेपाडा
  6. आंबोडे (सुरगाणा)
  7. आंबुपाडा
  8. आमदाबऱ्हे
  9. आमदापळसण
  10. आमझर
  11. आवळपाडा
  12. काठीपाडा
  13. बाफळुण
  14. बर्डीपाडा
  15. बाऱ्हे
  16. बेडसे (सुरगाणा)
  17. बेंडवळ
  18. भदर
  19. भाटी (सुरगाणा)
  20. भातविहीर
  21. भावंडगड
  22. भावडा
  23. भेगु
  24. भेणशेत
  25. भिंतघर
  26. भोरमाळ
  27. बिजुरपाडा
  28. बिवळ
  29. बोरचोंड
  30. बोरगाव (सुरगाणा)
  31. बुबळी
  32. चंद्रपूर (सुरगाणा)
  33. चिकाडी
  34. चिखली (सुरगाणा)
  35. चिंचाळे (सुरगाणा)
  36. चिंचपाडा (सुरगाणा)
  37. चिराई (सुरगाणा)
  38. डांगराळे
  39. देवगाव (सुरगाणा)
  40. देवळा (सुरगाणा)
  41. देशमुखनगर (सुरगाणा)
  42. देवलदरी
  43. दोडीचापाडा
  44. डोल्हारे (सुरगाणा)
  45. दुधवळ
  46. दुर्गापूर (सुरगाणा)
  47. फणसपाडा
  48. गडगा
  49. गहळे
  50. गाळबारी
  51. गाळवड
  52. गणेशनगर (सुरगाणा)
  53. गारमाळ
  54. घागबारी
  55. घोडांबे
  56. गोंदुणे
  57. गोपाळनगर (सुरगाणा)
  58. गोपाळपूर (सुरगाणा)
  59. गुहीजांभुळपाडा
  60. गुरटेंभी
  61. हाडकाईचोंड
  62. हनुमंतमाळ
  63. हरणटेकडी
  64. हास्ते
  65. हातगड (सुरगाणा)
  66. हातरुंडी
  67. हट्टी
  68. हट्टीबुद्रुक
  69. हेमाडपाडा
  70. हिरडीपाडा
  71. जाहुले
  72. जांभुळपाडा (सुरगाणा)
  73. जामुनमाथा
  74. काहंडोळपाडा
  75. काहंडोळसा
  76. काळमाने
  77. करंजाळी
  78. करंजुल
  79. करंजुलसुरगाणा
  80. करवंदे (सुरगाणा)
  81. केळवण
  82. खडकमाळ
  83. खडकीदिगर
  84. खारूडे
  85. खिरडी
  86. खिरमाण
  87. खोबळामणी
  88. खोबळेदिगर
  89. खोकरी
  90. खोकरविहीर
  91. खुंटविहीर
  92. कोटंबा
  93. कोटंबी
  94. कोठुळे
  95. कृष्णनगर (सुरगाणा)
  96. कुकुडमुंडा
  97. कुकुडणे
  98. लाडगाव
  99. महिषमाळ
  100. मालेगाव (सुरगाणा)
  101. माळगव्हाण
  102. माळगोंदे
  103. मांढा
  104. मांडवे (सुरगाणा)
  105. मांगढे
  106. माणी
  107. मणखेड
  108. मासतेमाण
  109. मेरदांड
  110. म्हैसखडक
  111. मोधाळपाडा
  112. मोहपाडा
  113. मोरचोंडा
  114. मोठामाळ
  115. मुरुमदरी
  116. नडगदरी
  117. नागशेवडी
  118. नवापूर (सुरगाणा)
  119. निंबरपाडा
  120. पळशेत (सुरगाणा)
  121. पळसण
  122. पालविहीर
  123. पांगारणे
  124. पाटाळी
  125. पायरपाडा
  126. पिळुकपाडा
  127. पिंपळचोंड
  128. पिंपळसोंड
  129. पोहाळी
  130. प्रतापगड (सुरगाणा)
  131. रघतविहीर
  132. राहुडे (सुरगाणा)
  133. राक्षसभुवन (सुरगाणा)
  134. रांजुणे
  135. रानविहीर (सुरगाणा)
  136. राशा
  137. रोकडपाडा
  138. रोंघाणे
  139. रोती (सुरगाणा)
  140. साबरदरा
  141. सादुडणे
  142. साजोळे
  143. सालभोये
  144. सांबरखळ
  145. संजयनगर
  146. सराड
  147. सरमळ
  148. सतखांब
  149. सायलपाडा
  150. शिंदे (सुरगाणा)
  151. श्रीभुवन
  152. श्रीरामपूर (सुरगाणा)
  153. सोनगीर (सुरगाणा)
  154. सुभाषनगर (सुरगाणा)
  155. सुकतळे
  156. सुळे (सुरगाणा)
  157. सुंदरबन (सुरगाणा)
  158. सुरगाणा.
  159. सूर्यगड
  160. तळपाडा
  161. तापुपाडा
  162. ठाणगाव (सुरगाणा)
  163. तोरणडोंगरी
  164. उदळदरी
  165. उदयपूर (सुरगाणा)
  166. उदमाळ
  167. उमरेमाळ
  168. उंबरदे (सुरगाणा)
  169. उंबरपाडा (सुरगाणा)
  170. उंबरपाडादिगर
  171. उंबरठाण
  172. उंबरविहीर
  173. उंडओहळ
  174. वडमाळ
  175. वाघनखी
  176. वांजुळपाडा
  177. विजयनगर (सुरगाणा)
  178. वडपाडा
  179. वाघाडी (सुरगाणा)
  180. वाघधोंड
  181. वाळुतझिरा
  182. वांगण
  183. वांगणसुळे
  184. वांगणपाडा
  185. वारांभे
  186. झगडपाडा

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
सुरगाणा तालुका
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?