For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for शूद्रा: द राइझिंग.

शूद्रा: द राइझिंग

शूद्र: द राइझिंग
दिग्दर्शन संजीव जायस्वाल
कथा संजीव जायस्वाल
प्रमुख कलाकार किर्रण शरद, प्रवीण बेबी
संगीत जान निसार लोने
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २०१२
अवधी १२० मिनिटे


शूद्र: द राइझिंग (मराठी: शूद्रः एक बंड) हा जातिव्यवस्थेच्या उतरंडीवर झोत टाकणारा संजीव जायसवाल निर्मित हिंदी चित्रपट आहे.[] या चित्रपटातून शूद्रांच्या जीवनाचे भयंकर चित्रण केलेले असून त्यांचा कशाप्रकारे छळ केला गेलाय याचेही वर्णन आढळते. कोट्यवधी शुद्रांना गुलामिच्या बंधनातुन मुक्त करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हा चित्रपट समर्पित केला गेलेला आहे.

कथानक

[संपादन]
  • सांदली या शूद्र (अस्पृश्य) स्त्रीकडे गावातल्या ठाकूराचे लक्ष जाते. एरव्ही शूद्रांना पाठीशी झाडू बांधून फिरायला लावणाऱ्या ठाकूराला अस्पृश्य स्त्रीचे सौंदर्य भोगताना शिवाशिवीचा (अस्पृश्यतेचा) त्रास होत नसतो. ती गर्भवती असतानाही तिला जबरदस्तीने उचलून नेले जाते. विरोध केल्याबद्दल तिच्या पतीला मारहाण होते आणि त्यातच त्याचा जीव जातो.
  • खेळताना कानावर पडलेले शब्द 'ओम नमः शिवाय' हे उच्चारल्याने चार पाच वर्षाच्या लहान मुलाची सर्वांदेखत जीभ कापली जाते आणि ते सहन न होऊन ते बालक मरण पावते. गावाबाहेरच्या या अस्पृश्यांचे रूदन कुणाच्या कानी पडत नसते.
  • मरणप्राय असलेल्या एका वृद्ध वडिलांसाठी नदीतून पिण्याचे पाणी आणायला गेल्याला त्यांच्या मुलाला शूद्र असल्यामुळे सवर्णांकडून मारहाण होते आणि पाण्याअभावी तो वृद्ध मरण पावतो.
  • या सर्व अत्याचारांचा काही शूद्र तरुण बदला घ्यायचा ठरवतात तेव्हा त्यांच्या वस्तीतले काही शहाणे लोक त्यांना इतरांच्या जिवाशी खेळू नका असा सल्ला देतात. त्या तरुणांना ठाकूराच्या मुलाला मारून काही प्रमाणात समाधान मिळते खरे, पण त्याचा परिणाम म्हणून ज्यात लहान मुले, वृद्ध, बायका यांना जिवंत जाळले जाते असा अंगावर येणारा नरसंहार होतो.[] []

वेदनांचे भीषण चित्रण समोर येताना ज्यांनी ज्यांनी हे भोगले आहे त्यांच्या भावनांना पारावार राहत नाही. आपल्या पूर्वजांना काय भोग भोगावे लागले होते हे ऐकून, वाचून आणि पिढ्यान्‌पिढ्यांच्या चालत आलेल्या कहाण्यांमधून समजलेले सत्य पडद्यावर जिवंत होताना खरोखरच हजारों वर्षांच्या पितरांचे श्राद्ध घातल्यासारखे वाटते.

ज्यांनी हे भोगलेले नाही पण माणुसकीवर विश्वास आहे त्यांचीही अवस्था बाहेर येताना वेगळी नसते. “धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.” असा संदेश हा सिनेमा देतो, जो दलितांचे उद्धारक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी विचार आहे.[][]

रेटींग

[संपादन]

टाइम्स ऑफ इंडियाची चित्रपट समीक्षक रेणूका व्यवहारे म्हणते की, “In spite of the film being extremely tragic, it works, as the storytelling and setting is authentic. The actors perform exceptionally well. The outfits, makeup, art direction, cinematography is first-rate. The music is touching and meaningful.” []

टाइम्स ऑफ इंडिया ने या चित्रपटास क्रिटिक रेटिंगमध्ये ५ पैकी ३ तर प्रेक्षकांच्या रेटिंगमध्ये ५ पैकी ४ स्टार्स दिले आहेत.[]

चित्रपट निर्मिती मागील प्रेरणा

[संपादन]

१४ एप्रिल आंबेडकर जयंती दिनी संजीव जैस्वाल दूरचित्रवाणीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) यांच्यावर आधारित माहितीपट पाहत होते. डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील हा माहितीपट काहीसा अपूर्ण असल्याची जाणीव त्यांना त्या वेळी झाली आणि त्यावेळी त्यांनी चित्रपट बनवण्याचा निश्‍चय केला. अभ्यासकांची एक टीम तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील साहित्याचा अभ्यास सुरू केला. दलित आणि शूद्र जातींना सोसाव्या लागत असलेल्या विषमतेच्या चटक्‍यांनी जैस्वाल यांना अस्वस्थ केले. इतिहास आणि वर्तमानातील जातिव्यवस्थेच्या या भीषण वास्तवाला सर्वत्र पोचविण्यासाठी मोठा कॅनव्हास निवडला.[] हा चित्रपट बनवण्यासाठी संजीव जैस्वाल यांनी आपलं घरही गहाण ठेवलेलं होते..[]

कलावंत

[संपादन]
कलाकार

किरण शरद, प्रवीण बेबी, श्रीधर दुबे, महेश बलराज, आरिफ राजपूत, गौरी शंकर, प्रिया अनंतराम, शाहजी चौधरी, शाहबाज बावेजा, सत्यम चव्हाण, राधा श्रीवास्तव.

सिनेमॅटोग्राफर

प्रतीक देवरा

कथा आणि संवाद

संजीव जैस्वाल[]

प्रदर्शनातील अडथळे

[संपादन]

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य आणि शूद्र अशा चार वर्णांत विभागलेल्या हिंदू धर्मील जातिव्यवस्था याच धर्माचा एक अविभाज्य भाग असलेल्या आणि बहुसंख्य असलेल्या शूद्र जातींचे माणूसपण कसे नाकारले याचे चित्रण असलेला "शूद्रा द रायझिंग' या चित्रपटाला अडथळ्यांची मोठी शर्यत पार करावी लागली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजीव जैस्वाल यांना चित्रीकरणापासून ते चित्रपट प्रदर्शित करेपर्यंत तारेवरची कसरत करावी लागली. सुरुवातीला चित्रीकरणात आलेले अडथळे, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने दिलेला त्रास, अखिल भारतीय ब्राह्मण सभेसह अन्य संघटनांचा विरोध आणि आता सिनेमागृहचालकांचे आडमुठे धोरण यामुळे या चित्रपटाची अवस्थाही शूद्रासारखीच झाली होती परंतु तरीही हा चित्रपट हाऊसफूल राहिला आणि प्रेक्षकांना आवडला.[]

आंबेडकर-गांधी तुलना

[संपादन]

या चित्रपटाच्या माध्यमातून दिगदर्शकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा गांधी या दोघांनी मानव जातीच्या उत्थानासाठी केलेल्या कार्यांची तुलना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधींपेक्षा अधिक मोठे ठरवले गेले आहे. दिग्दर्शक संजीव जैस्वाल म्हणतात की, “गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, पण बाबासाहेबांनी हजारो वर्षापासून पिचलेल्या दबलेल्यांना मानवी स्वातंत्र्य बहाल केले आहे आणि मानवी स्वातंत्र्य हे जगातील अन्य कुठल्याही स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून आमचे मानणे आहे की, बाबासाहेब हे गांधींहून महान आहेत.’’[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://online2.esakal.com/esakal/20121018/5168469874389464166.htm[permanent dead link]
  2. ^ a b c "संग्रहित प्रत". 2012-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-21 रोजी पाहिले.
  3. ^ a b http://www.hindimedia.in/2/index.php/manoranjanjagat/cinema/film-samiksha/3059-shudra.html[permanent dead link]
  4. ^ a b http://timesofindia.indiatimes.com/entertainment/movie-reviews/hindi/Shudra-The-Rising/movie-review/16876847.cms
  5. ^ a b c "संग्रहित प्रत". 2012-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-21 रोजी पाहिले.
  6. ^ Dr Ambedkar is greater than Gandhi

बाह्य दुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
शूद्रा: द राइझिंग
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?