वर्सोवा (मुंबई)
वेसावे किंवा वर्सोवा हा भारताच्या मुंबई शहराचा एक भाग आहे. उच्चभ्रू वस्तीत गणला जाणारा हा भाग अंधेरी उपनगरात मोडतो.
इतिहास
[संपादन]येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. इ.स. १७३९पर्यंत हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्याची नोंद आढळते. १७३९ च्या वसईच्या लढाईदरम्यान मराठ्यांनी हा प्रदेश जिंकला व त्याबरोबरच तेथील किल्लाही. नंतर मुंबईतील इंग्रजांच्या अंमलाखाली आलेला हा प्रदेश १९४७मध्ये भारतात विलीन झाला.
समुद्रकिनारा
[संपादन]येथील खाडीसदृश समुद्रकिनाऱ्यावर अनेक लोक भेट देतात. किनाऱ्याची झीज होण्यापासून रक्षण करण्याकरता प्रचंड आकाराचे दगड समुद्रात टाकण्यात आलेले आहेत परंतु भरतीच्या वेळी हा सगळा किनारा पाण्याखाली जातो. वेसावे खाडीला कांदिवलीतून वहात येंणारी पोयसर नदी मिळते. वेसावे हे मासेमारीचे एक बंदर आहे.
किल्ला
[संपादन]पोर्तुगीजांनी बांधलेला[१] वर्सोवा किल्ला किंवा मढ किल्ला येथून जवळ आहे. मालाड रेल्वेस्थानकापासून १५ कि.मी. अंतरावर अक्सा बीचजवळ असलेला हा किल्ला बेस्टच्या २७१ मार्गाचे शेवटचा थांबा आहे. वर्सोव्याहून फेरी बोटीनेही येथे पोचता येते. येथून मुंबईपासून वसईपर्यंतचा किनारा, समुद्र तसेच मार्वे खाडी टेहळता येते. या किल्ल्याजवळ भारतीय नौदलाचा तळ असून किल्ला भारतीय वायुसेनेच्या ताब्यात आहे. येथे अनेक चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांचे फिल्मीकरण होते.
चित्रदालन
[संपादन]-
लांबून
-
जवळून
-
बुरूजातून
-
बुरूज
-
विरुद्ध बाजूने (वर्सोव्याकडून)
संदर्भ
[संपादन]दक्षिण मुंबई उपनगर | कुलाबा · परळ · घारापुरी द्वीप · फोर्ट · दादर · माहिम · महालक्ष्मी · मरीन लाइन्स · चर्चगेट · माटुंगा · प्रभादेवी · नरीमन पॉइंट · नेव्ही नगर · ताडदेव · गिरगाव · काळबादेवी · वरळी · कफ परेड · मलबार हिल · भायखळा · चिंचपोकळी · वडाळा · वाळकेश्वर · काळा घोडा · खोताची वाडी · माझगाव · शिवडी · दादाभाई नौरोजी रस्ता · अपोलो बंदर |
---|---|
पूर्व मुंबई उपनगर | |
पश्चिम मुंबई उपनगर | अंधेरी · वांद्रे · गोरेगाव · मालाड · जुहू · कांदिवली · बोरीवली · सांताक्रुझ · विलेपार्ले · दहिसर · वर्सोवा · कान्हेरी गुहा · जोगेश्वरी · आरे दूध वसाहत · मरोळ |
नवी मुंबई | |
ठाणे शहर | |
मीरा-भाईंदर | |
कल्याण-डोंबिवली | |
वसई-विरार | |
भिवंडी-निजामपूर | |
उल्हासनगर | |
नगर परिषद |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.