मार्कंडा किल्ला
मार्कंडा किल्ला | |
नाव | मार्कंडा किल्ला |
उंची | ४३८३ फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | महाराष्ट्र |
जवळचे गाव | कळवण तालुक्यातले बाबापूर |
डोंगररांग | अजंठा सातमाळ |
सध्याची अवस्था | बरी |
स्थापना | (({स्थापना))} |
मार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय या नावाने ओळखला जाणारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.
इतिहास
[संपादन]शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले.
मार्कंड्या गडाकडे जाण्यासाठीचे रस्ते
[संपादन]सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ कि.मी. अंतरावर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ कि.मी. वरील मुळणबारी खिंडीत येतो. येथपर्यंत एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या–जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
[संपादन]मार्कंड्या व रवळ्या–जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, तिला मुळणबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडाच्या दिशेने चढून गेले की पहिल्या टप्प्यावर एक पठार लागते. ही गडाची माची आहे.
माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या, बांधलेल्या पायऱ्या आहेत. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्याखाली कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. त्यांना ‘ध्यान गुंफा’ म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायऱ्यांचा टप्पा संपला की समोर सप्तशृंगी गड दिसतो. त्यानंतर लागणाऱ्या डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते.
काय पहावे?
[संपादन]बालेकिल्ल्यावरून गडावर जाण्यासाठी तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कोरलेले टाके पाहाता येते. या टाक्याला ‘कमंडलू तीर्थ’ म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसऱ्या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेले टाके आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलिंंग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरून सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या आणि धोडप हे किल्ले दिसतात.
जाण्यासाठी लागणारा वेळ
[संपादन]मुळणबारी (मुळाणे) खिंडीतून गडावर पोहोचायला एक तास लागतो.
गडावरील सोयी
[संपादन]गडावर रहाण्याची, जेवणाची सोय नाही. गडावरील कमंडलू तीर्थ या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे. गडावर धार्मिक काम करणारे आश्रम नानामहाराज वडाळीभोईकर यांच्या आश्रमात मुक्कामाची सोय होऊ शकते.
संदर्भ
[संपादन]- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
[संपादन]महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) | |||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
बागलाण | |||||||||||||||||
धुळे | |||||||||||||||||
वणी - सातमाळा | |||||||||||||||||
मनमाड | |||||||||||||||||
अजिंठा | |||||||||||||||||
नाशिक - त्र्यंबक रांग | |||||||||||||||||
कुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला | |||||||||||||||||
जुन्नर | हरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड | ||||||||||||||||
भिमाशंकर | |||||||||||||||||
लोणावळा | |||||||||||||||||
पुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे) | |||||||||||||||||
भोर - (भोर-महाबळेश्वर-शिवथर) | |||||||||||||||||
महाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे) | |||||||||||||||||
सातारा - (वाई-सातारा-फलटण) | |||||||||||||||||
कराड | |||||||||||||||||
कोयनानगर | |||||||||||||||||
कोल्हापूर - पन्हाळ | |||||||||||||||||
|
हरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड | |||||||||
किल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला • भोरगिरी• सिंदोळा किल्ला | |||||||||
अंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड | |||||||||
अलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड | |||||||||
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.