मराठी नाव- मांडूळ, दुतोंड्या(वर्धा),माटीखाया(विदर्भ),मालण(गोवा). इंग्रजी नाव-Earth Boa/ Red Sand Boa. शास्त्रीय नाव-Eryx johnii
सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे.मंद हालचाल,जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी.तोंड व शेपटी आखूड.डोळे लहान,बाहुली उभी.जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर भक्ष्य गिळतो.
सरासरी लांबी-75सें.मी.(2फूट 6इंच). अधिकतम लांबी-100सें.मी.(3फूट3इंच)
प्रजनन-ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान मादी एकावेळेस साधारण 6-9 पिलांना जन्म देते. पिलांचा रंग लालसर तपकिरी व त्यावर काळ्या रंगाचे पूर्ण गोलाकृती पट्टे. हे पट्टे कालांतराने नाहीसे होतात.
खाद्य-मुख्यतः उंदीर किंवा लहान सस्तन प्राणी,पाली.सऱडे,छोटे पक्षी
आढळ- महाराष्ट्रात सर्वत्र
वास्तव्य-मऊ जमिनीत बिळात राहणारा हा साप कोरड्या जागा पसंद करतो.पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास जमिनीवर येतो.
वैशिष्ट्ये- निशाचर, तोंड व शेपटी साधारण सारखीच दिसते
This browser is not supported by Wikiwand :( Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience. Please download and use one of the following browsers:
Your input will affect cover photo selection, along with input from other users.
X
Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?
Oh no, there's been an error
Please help us solve this error by emailing us at support@wikiwand.com
Let us know what you've done that caused this error, what browser you're using, and whether you have any special extensions/add-ons installed.
Thank you!