भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस भुवनेश्वर ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १८०० किमी अंतर २५ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.
मार्ग
[संपादन]भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसचे दोन मार्ग आहेत:
- 22811/22812 भुवनेश्वर ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून तीनदा अद्रामार्गे धावते.
- 22823/22824 भुवनेश्वर ते नवी दिल्ली दरम्यान आठवड्यातून चारदा बोकारोमार्गे धावते.
|
बाह्य दुवे
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.