For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for ब्राह्मणेतर चळवळ.

ब्राह्मणेतर चळवळ

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?

कै.श्रीधरपंत टिळकांच्या(मृत्यू १९२८) शब्दांत सध्याचे युग हे लोकशाहीचे युग आहे. एकंदर हिंदू समाजही संक्रमणावस्थेत आहे. भगवंतांनी निर्माण केलेली श्रमविभागरूप चातुर्वर्ण्यव्यवस्था गुणकर्मविभागशः चालू राहाती, तर ती अतीव त्याज्य ठरून त्याविरुद्ध बंड पुकारण्याची पाळी कनिष्ठ किंवा निकृष्ठ वर्गावर आली नसती. परंतु देशाच्या दुर्दैवाने चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध स्वरूपात वज्रलेप होऊन बसल्यामुळे त्यापासून अनर्थ ओढवला आहे. पुरातन काळी वर्णाश्रमधर्माने इष्ट कामगिरी बजावली असेल, असे नाही. परंतु आता चातुर्वर्ण्यास जितक्या लवकर मूठमाती मिळेल तितकी बरी. ब्राह्मणेतर चळवळ हे ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध म्हणून उदयाला आले उच्चवर्णीयांची वर्चस्व झुगारून देऊन समाजामध्ये सामाजिक ऐक्य समता आणि सलुका प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ही चळवळ उभी राहिली ब्राह्मणेत्तर चळवळीने वर्चस्ववादी सामाजिक वर्चस्वाला विरोध केला या चळवळीतील नेत्यांची भावना ब्राह्मण वर्ग हाच बहुजन समाजाच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहे त्यामुळे ब्राह्मण वर्गाला वगळून इतर सर्व जातीतील लोकांच्या संघटना वर ब्राह्मणेतर चळवळीने भर दिला यातून ब्राह्मणेतर चळवळीच्या कार्याला गती प्राप्त झाली ब्राह्मणेतर चळवळीचे काही नेते राज्यकारभारात भाग घेण्याबाबत उत्सुक होते कारण इंग्रजांनी भारतीयांना राजकीय सवलती देण्यास सुरुवात केली त्याचा फायदा हा बहुजन समाजातील नेत्यांना मिळावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले खरेतर हा फायदा बहुजन समाजातील नेत्यांना मिळावा अशी ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांची भूमिका होते त्यांनी राजकीय सत्तेचा प्रभाव आणि परिणामकारकता ओळखली होती ब्राह्मणेतर चळवळीच्या माध्यमातून या काळामध्ये अनेक सुधारणावादी प्रयोग केले गेले []

ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय ? आणि त्याची उद्दिष्ट्ये

[संपादन]

भारतीय चातुर्वर्ण्य आणि वतन परंपरेतून निर्माण झालेली विषमता राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व स्तरावरून नष्ट करून समताप्रधान, समानसंधी समाजाच्या सकारात्मक रचनेचे कार्य बहुजनांच्या सक्रियतेने साधणे असे ब्राम्हणेतर चळवळीमध्ये अभिप्रेत होते.

त्या काळीसुद्धा ब्राम्हण समाज मुख्य सत्तेपासून दूर होता आणि ब्राम्हणांचा प्रत्यक्ष प्रभाव मर्यादित होता. तरी सर्व विषमतेस एकट्या आणि संपूर्ण ब्राह्मण समुदायास लक्ष्य करणे हा चळवळीपेक्षा वेगळे मत मांडणाऱ्यांचा मुख्य आक्षेप होता. त्यांचा आक्षेप समतावादी सुधारणांना नव्हता तर, ब्राह्मणेतर शब्द ब्राम्हणसमूहलक्षी बनल्यामुळे चळवळीला सरसकट ब्राह्मणद्वेषाचे स्वरूप तर येणार नाहीना अशी शंका व्यक्त करणारा होता.

भारतीय चतुर्वर्ण आणि वतनी व जातीय व्यवस्थेतून निर्माण झालेली विषमता भारतात येणाऱ्या परकीय आक्रमकांना वेळोवेळी सोयीची झाली. त्यामुळे अशी विषमता घालवणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तथाकथित उच्च वर्णीयांतून आलेले महात्मा गांधी, साने गुरुजी, वि.दा. सावरकर, श्रीपाद अमृत डांगे, धोडो केशव कर्वे, इत्यादी सामाजिक नेते पुढे आले आणि त्यांनी राजर्षी शाहू आणि आर्यसमाजप्रणीत ब्राम्हणेतर चळवळीस पूरक अशा समाज सुधारणांना आणि अस्पृश्यता निर्मूलन चळवळींना होता होईतो हातभार लावला. हा त्यांचा सहभाग सुधारणावाद्यांना प्रत्येक वेळी पुरेसा वाटलाच असेही नाही. ब्राह्मणेतर चळवळीचा मुख्य उद्देश हा समाजामध्ये वरिष्ठा यांचे वर्चस्व कमी करताना समाजात धार्मिक सांस्‍कृतिक आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये असलेली एकाधिकारशाही नष्ट करणे व त्यातून होणाऱ्या कनिष्ठ जातीचे शोषण थांबवणे त्याचप्रमाणे समाजातील विषमता दूर करणे या उद्देशाने ब्राह्मणेत्तर चळवळीने प्रामुख्याने कार्य केले

ऐतिहासिक संदर्भ

[संपादन]

पुरेशा ऐतिहासिक साधनांच्या अभावी सिंधू संस्कृती आणि प्राग्‌ ऐतिहासिक काळाबाबत विविध तर्कच केले जातात. जनुकीय अ‍ॅनालिसिस आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या अभावाने कालौघात निराधार ठरलेला, आर्य हे भारताबाहेरून आले हा तर्क ब्रिटिशकाळात स्वीकारला गेला होता. सनातन ब्राम्हणीय चातुर्वणीय परंपरा या बाहेरून येऊन जेते झालेल्या आर्यांच्या प्रातिनिधिक समजल्या जाऊ लागल्या. यातून दक्षिणी भारतीयांनी स्वतःस द्रविड समजून हिंदवेतर आणि ब्राम्हणेतर चळवळींची कास धरली.

यातच विष्णू आवतार आणि इतर पुराण कथातून असलेल्या संघर्षांचा अर्थही ब्राम्हण-क्षत्रिय वा सवर्ण-मागासवर्गीय अथवा आर्य-अनार्य संघर्ष असा घेतला गेला.

यात भर म्हणजे रामायणकालीन शंबूकवध, आदिवासी एकलव्य आणि सूतपुत्र कर्णास शिक्षण नाकारण्यासंबंधी संबधी रामायण-महाभारतातील उल्लेख. मनुस्मृती आणि शतपथ ब्राह्मणातली शूद्र आणि ब्राम्हणेतर समाजावरील असमान तत्त्वावरील असहिष्णूताही ब्राम्हणेतर समाजास खटकू लागली .

अस्पृश्यतेच्या परंपरा आणि शिक्षणास नकार व प्रत्यक्ष जीवनातील असमानता यामुळे गंजलेल्या बहुजन समाजास बाहेर काढण्याचे प्रयत्न ब्राम्हणेतर आणि संबधित विविध समाज सुधारणा चळवळींच्या योगाने झाला. ब्राम्हण आणि सवर्ण समाजाने कधी कुरकुरत तर कधी स्वतः पुढाकार घेत आर्थिक हितसंबधांचे जमेल तसे रक्षण करीत मार्गक्रमण सुरू ठेवले. ब्राह्मणेतर चळवळीने समाजामध्ये वर्णव्यवस्थेवर आधारित सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला या काळामध्ये कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी चळवळीला चालना दिली संपूर्ण संस्थानांमध्ये सत्यशोधकी विचारांचा प्रसार करताना त्यांनी समाजातील दलित पीडित शोषित वर्गाला न्याय आणि हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला कुठलीही व व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ असत नाही तर ती व्यक्ती आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरते याचा पुनरुच्चार करत त्यांनी अनेक लोकांना पंडित शास्त्री अशा उपाध्या देऊन त्यांचा गौरव केला इतकच नाही तर धार्मिक विधी प्रसंगी अनेक जाती धर्मातील लोकांना त्यांनी मंत्र उच्चारण्याचा अधिकार देऊ केला यातून पुरोगामी महाराष्ट्राच्या घडविला एक नवी दिशा मिळाली

चातुर्वर्ण्यव्यवस्था

[संपादन]

मनुस्मृती शतपथ ब्राम्हण

वतनपद्धती

[संपादन]

वतन ही गोष्ट वंशपरंपरागत असते. जात, व्यवसाय, काम, उत्पन्न, अधिकार, वडिलोपार्जित संपत्ती, जन्मभूमी या सर्व गोष्टी ‘वतन’ शब्दात अंतर्भूत होतात.

महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील ग्रामव्यवस्थेचे एके काळी जे बलस्थान होते, ते म्हणजे वतनपद्धती. त्यातूनच पुढे काही प्रश्न निर्माण झाले. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत या प्रश्नांमुळे निर्माण झालेली गुंतागुंत सोडणे हे आजच्या समाजसुधारक, राज्यकर्ते व विचारवंतांपुढचे मुख्य आव्हान आहे.

ग्रामजीवन हे कृषिप्रधान असल्यामुळे कृषिविषयक सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ही वेगवेगळी वतने निर्माण झाली. या वतनातून बलुतेदारी अधिक स्पष्ट होत गेली. तत्कालीन ग्रामसंस्कृतीचा अभ्यास केला तर हे लक्षात येते, की या एकसंध वतन, आसाम्या व बलुतेपद्धतीतून ग्रामीण अर्थव्यवस्था स्वतंत्रपणे कार्यरत राहिली. एकमेकांच्या आर्थिक, वैयक्तिक व धार्मिक स्वरूपाच्या गरजा पूर्ण केल्या जात. एका अर्थाने अलिखित अशी ही ‘सेवापद्धती’ किंवा स्थानिक ‘सर्व्हिस इंडस्ट्री’च होती, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

फुले शाहू महाराज ते आंबेडकर पर्व

[संपादन]

जातिउद्धाराच्या चळवळीची सुरुवात कुठून धरावी ?

[संपादन]

जातिनिर्मूलनाच्या चळवळीची सुरुवात करणारे प्रामुख्याने तीन गट आढळतात. एक गट अखिल भारतीय पातळीवरील तथागत गौतम बुद्ध, महावीर, आदी शंकराचार्य, बसवेश्वर, गुरू नानक देव आणि काही दाक्षिणात्य संतांचा गट. महाराष्ट्राच्या पातळीवर महानुभाव पंथीय, संत ज्ञानेश्वर आणि वारकरीपंथीय संत. या तीन गटांचे कार्य महत्त्वाचे आहे. ब्राम्हण संताचे कार्य ब्राम्हणेतर चळवळ सहसा नाकारताना आढळते. ब्राम्हणेतरांच्या उद्धारासाठीचा खरा सकारामक आणि लक्षणीय प्रयत्न महात्मा फुले, राजर्षी शाहू, आंबेडकर आणि तमिळ नेते यांच्यापासूनच सुरू झाला . आधीच्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांना ब्राम्हणेतर प्रभावशाली मानत नाहीत.

सनातनी आणि सुधारक वाद

[संपादन]
  • समता आणि समरसता

लोकमान्य टिळकांच्या काळातच सनातनी आणि सुधारक यांच्यातील वाद झगड्यांच्या स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी दिसून येत असत. या वादाचे एक वैशिष्ट्य असेकी लोकमान्यांची स्वतःची दोन्ही मुले सुधारकांच्या बाजूने क्रियाशील होती.

लोकमान्य टिळकांना ब्राम्हणेतरांना सरसकट शिक्षण नाकारले गेले हा मुद्दा मान्य नव्हता. ब्राम्हणेतरांच्या अशिक्षणास ब्राम्हणेतरांची उदरनिर्वाह करणे अणि धनधान्यादी उत्पन्न मिळवणे ही प्राथमिकता होती म्हणून ते स्वतःच शिक्षणाबाबत उदासीन आहेत असा निष्कर्ष लोकमान्य टिळख काढतात.

साहजिकच, लोकमान्यांनी भारतात आलेल्या मॉंटेग्यू- चेम्सफर्ड यांच्या बरोबरील चर्चेत जातिनिहाय मतदारसंघांस विरोध केला होता.

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात,

एकाने विद्या, तर दुसऱ्याने द्रव्य पसंत केले ! `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर' असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हणले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही', असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही', असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसऱ्याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.'

शिक्षणविषयक सवलती सर्व प्रजेला समान असतांना ब्राह्मणेतर शिक्षणाकडे वळायला नाखूष असतात असा लोकमान्यांचे मत होते.' पुस्तकी विद्या मिळवण्याच्या कामी ब्राह्मणेतर उदासीन' या अग्रलेखात ते म्हणतात, `ब्राह्मणेतरांत सुशिक्षित मिळतील, तर सरकार त्यांनाच आधी नेमील; पण शिक्षणविषयक सर्व सवलती समान असताही केवळ धंद्याच्या आवडीने ब्राह्मणेतर हे अद्यापि पुस्तकी शिक्षणाकडे वळावे तितके वळत नाहीत, याला कोणी काय करावे !' दुसऱ्या बाजूने न.चि.केळकरांच्या नेतृत्वाखालील केसरी, सुधारकांवर टीकास्त्र सोडत होता. केसरीतील एका तत्कालीन सनातनी टीकेचे उदाहरणः

१९१७ ते २० च्या अवधीत ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधकी धिंगाण्याने महाराष्ट्रात अनन्वित धुमाकूळ घातला. ह्या धिंगाण्याला चळवळ हे नाव देऊन संबोधणे म्हणजे त्या शब्दाचा व त्या अभिधानाने ओळखावयाच्या इतर कार्याचा अपमान करण्यासारखे आहे. इतकी ही सत्यशोधकी वावटळीची हीन वळवळ होती.[]

तत्कालीन ब्राह्मण समाजाकडून ब्राम्हणेतरांना हीन लेखले जाणे याच्या प्रतिक्रियेत ब्राम्हणेतर चळवळीच्या उत्तरकाळात म्हणजे एकविसाव्या शतकात ब्राम्हणेतरांनी ब्राह्मणांना हीन लेखण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आढळून येते [ संदर्भ हवा ] संत ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे आदी लोकांबद्दल टिका करण्याची प्रवृत्ती या शतकात वाढीस लागली.

ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व आणि टप्पे

[संपादन]

१९२० नंतर कोल्हापूर नरेश शाहूमहाराज यांच्या उदारमोकळ्या रूपाने ब्राह्मणेतर चळवळीला नेतृत्व मिळाले. त्याकाळात विठ्ठल रामजी शिंदे , डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यताविरोधी मोहीम हाती घेतली होती

चळवळीचे यश

[संपादन]

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून सुरू झालेली सामाजिक चळवळ ही बौद्धिक व वैचारिक विचारांचे मंथन होती. त्यातून विविध समाजातील व जातिवर्गातील नेतृत्व तयार होत गेले. त्यातून एक बौद्धिक बैठक अस्तित्वात आली; वेदकालापासून आजपर्यंतच्या समाजजीवनाची रहस्ये उलगडण्याचा, त्यातील विकृतींचा व अपप्रवृत्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न होत राहिला. भाषा, संस्कृती, कला, साहित्य, संगीत या सर्व परंपरांची नवी मांडणी होत गेली. एका अर्थाने ही चळवळ सामाजिक व सांस्कृतिक आरोग्यासाठी पोषक ठरली.

जातिसंस्थांचे पुनरुज्जीवन

[संपादन]

नव्या वर्गकलहात फक्त सत्तास्पर्धा व स्वतःच्या अस्तित्वाचे रखवालदार तयार होत आहेत. ‘व्होट बँक’ या एवढ्याच निकषावर नेतृत्व तयार होत आहे. हा नवा वर्गकलह व सत्ताकलह ग्रामीण भागात खोलवर रुजत चालला जातीअंताची निर्णायक लढाई म्हणून खरेतर सत्यशोधक चळवळ इकडे बघितले जात होते मात्र फुले प्रणित सत्यशोधकी विचारांना पुढे वेगळे स्वरूप प्राप्त झाले जातीअंताचा ऐवजी जातिभेद आणि वर्ण संघर्ष यामध्ये ही चळवळ काही प्रमाणात अडकली व्यवस्थेची मूल्य चौकट बदलण्याची क्षमता असलेल्या या चळवळीच्या मर्यादा अधोरेखित झालेले आहेत .[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3311682.cms[permanent dead link]. It is a snapshot of the page as it appeared on 18 Dec 2009 08:12:36 GMT.
  2. ^ Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=25211:2009-11-20-05-49-38&catid=110:2009-08-05-07-55-12&Itemid=123. [मृत दुवा] It is a snapshot of the page as it appeared on 8 Jan 2010 18:28:10 GMT.
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
ब्राह्मणेतर चळवळ
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?