For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for नवरत्‍ने.

नवरत्‍ने

नवरत्‍नांनी जडलेली सोन्याची अंगठी

पृथ्वीवर, जमिनीखाली, खडकांमध्ये किंवा जलाशयांच्या तळाशी सापडणारे जे काही मौल्यवान खडे किंवा तत्सम टणक व शोभिवंत वस्तू आहेत, त्यांना रत्ने म्हणतात. त्यांतल्या ९ मौल्यवान रत्‍नांना भारतीय ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नऊ रत्‍नांचा उल्लेख नवरत्‍ने असा होतो. नवग्रहांच्या गतीच्या व अवकृपेच्या मानवी जीवनावर होणाऱ्या तथाकथित वाईट परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी ज्योतिषी काही विशिष्ट रत्‍न वापरण्याचा सल्ला देतात. चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांनाच ज्योतिषी नवग्रह मानतात.

नवरत्ने

[संपादन]

खालील रत्‍नांचा नवरत्‍नांमध्ये समावेश होतो.

मोती (Pearl) (संस्कृत : मौक्तिकम्)

[संपादन]
मोती

समुद्रात राहणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या कालवाच्या शिंपल्यामध्ये मोती नैसर्गिकरीत्या तयार होतो. तो मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला असतो[]. या शिंपल्यामध्ये घुसलेल्या कणाभोवती शिंपल्यातील जीव एका खास पदार्थाचे थर चढवतो. असे थर जमा होऊन जी गोळी बनते तिलाच मोती असे म्हणतात. नैसर्गिकरीत्या समुद्रात तयार होणारे मोती (एकवचन - मोती, अनेकवचन - मोती, मोते किंवा मोत्ये) अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान मानले जातात. नैसर्गिक मोती रंगाने श्वेत (पांढरा) असतो. चंद्र ग्रह हा मोत्याचा स्वामी आहे अशी समजूत आहे.

इराकी "बसरा" मोत्यास पूर्वी भारतातील बाजारपेठेत खूप मागणी असे. हा मोती पिवळट आणि चमकदार असतो असे सांगितले जाते. अलिकडे व्हेनेझुएला येथील मोत्यांना चांगली मागणी आहे. व्हेनेझुएला येथील मार्गेरिटा बेट हे मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि हे मोती सप्टेंबर ते मे या महिन्यांमध्ये काढतात, मोत्यांच्या एका शिंपल्यात एकाहून अधिक मोती असू शकतात, परंतु मोठा गोलाकार असा मोती बहुधा एकच असतो असे काही जुन्या नोंदीं[]वरून समजते. त्याचप्रमाणे जपानी किंवा कल्चर्ड मोती यांनादेखील बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. कल्चर्ड मोती तयार करण्याची पद्धत जपानमध्ये सुरू झाली असे सांगितले जाते. ह्या पद्धतीत काही खास शिंपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या जिवांचे तंतू टाकले जातात. शिंपल्यातील प्राणी या तंतूंभोवती गोलाकार आवरण तयार करतो, असे सांगितले जाते[] . या पद्धतीवर मानवी नियंत्रण करता येत असल्याने मोत्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येते. कृत्रिम मोती हे काच, प्लास्टिक किंवा इतर द्रव्यांपासून बनवले जातात.

मोत्यांची पारख

[संपादन]

मोती एका फरशीच्या तुकडयावर खडूसारखे घासले तर खडूसारखीच पांढरट पूड (चूर्ण) बाहेर पडते. खऱ्या मोत्यांचे चूर्ण पडते, आणि तरीही मोत्याला चरे न पडता तो तसाच चमकदार आणि गुळगुळीत रहातो अशी समजूत आहे. नकली मोत्यांवर हा प्रयोग केल्यास त्यांना चरे पडतात आणि वरचे प्लास्टिक निघून आतली काच दिसते असेही म्हणतात.

साहित्यिक संदर्भ/म्हणी इत्यादी

[संपादन]

"असतील स्वाती तर पडतील मोती": स्वाती नक्षत्रावर पाऊस पडला की शिंपल्यात मोती बनतात अशी एक समजूत आहे.. "मोत्यांसारखी अक्षरे": दाणेदार, सुंदर, अक्षरांना मराठीत मोत्यांची उपमा दिली जाते.

पोवळे, प्रवाळ

[संपादन]

प्रवाळ (संस्कृत नाव: विद्रुम) (Red Coral) किंवा पोवळ्यांना जगभर दागिन्यांसाठी मागणी आहे. भारतातील प्रचलित समजांमध्ये प्रवाळाचे मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी महत्त्व सांगितले जाते. पण ही समजूत प्राचीन नसून अलीकडच्या शतकांमधली असावी असा अंदाज आहे. दागिन्यांमध्ये वापरले जाणारे प्रवाळ किंवा पोवळे हे साधारणपणे लाल रंगाचे असते. प्रवाळ मिळवण्यासाठी समुद्रात कित्येक मीटर खोल जावे लागते असे म्हणतात. प्रवाळाचे दागिन्यांमध्ये वापरताना असलेले आकार आखीवरेखीव असले तरी मूळ प्रवाळ हे शाखायुक्त असते. दागिन्यांमध्ये वापर करण्यासाठी असे प्रवाळ पॉलिश करून तसेच विशिष्ट आकारांमध्ये कापून वापरले जाते.

लाल पोवळे

ऐतिहासिक संदर्भ

[संपादन]

प्रवाळ (विद्रुम:) या नावाचे इतर अर्थ, भारतीय साहित्यातील संदर्भ आणि इतर उपयोग:[]
काही संस्कृत जाणकारांच्या मते विद्रुम - विचित्र द्रुम, (द्रुम = झाड, विद्रुम = विचित्र झाड, विशेष अर्थ प्रवाळ) त्यातून मिळवलेले ते वैद्रुम.[]
त्रिकाण्डशेषकोशात,
रक्तकन्दलो विद्रुमश्च सः । लतामणि: प्रवालः स्यात्‌ || अशी ओळ आहे आणि त्यावर शील-अखंड महाथेर यांची टीका आहे. तिच्यात रक्तकंद: हाही शब्द दिला आहे. महाथेर यांच्या मते विद्रुमः म्हणजे विशिष्टो द्रुमः.
आयुर्वेदीय शब्दकोशांत प्रवा(बा)ल:/प्रवा(बा)लम्‌ आणि त्याच अर्थाचा विद्रुमः हा शब्द आला आहे. वैद्रुम(विशेषण) म्हणजे विद्रुमासंबंधी. उदाहरणार्थ, विद्रुमचूर्ण म्हणजे प्रवाळभस्म.
प्रवाल(नाम)चे इतर अर्थ : पालवी, अंकुर, वीणेचा दांडा, वगैरे.
वीणादण्डः प्रवालः स्यात्‌ ।--अमरकोश १.७.७
विद्रुमः पुंसि प्रवालं पुन्नपुंसकम्‌ ।-- अमरकोश २.९.९३
प्रवालमङ्कुरेप्यsस्त्री ।--अमरकोश ३.३.२०५
वाल्मीकी रामायणातील बालकांडामध्ये जनकाने लग्नानंतर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी (रामाला) सोने, चांदी, मोती आणि पोवळी (विद्रुमे) दिली असे दिसते (ददौ कन्या शतं तासां दासी दासं अनुत्तमम्‌। हिरण्यस्य सुवर्ण्यस्य मुक्तानां विद्रुमस्यच ॥ (वाल्मीकिरामायण १.७४.५) []
गीतेच्या पंधराव्या (१५व्या) अध्यायात "अधश्चोर्ध्वम् प्रसृतास्तस्य शाखा: गुणप्रवृद्धा विषय प्रवाला:" असे अश्वत्थ वृक्षाचे वर्णन आहे तेथे हा शब्द आला आहे. प्रवाला: या शब्दाचा येथील अर्थ अंकुरे असा असावा. याचा भावार्थ जाणकारांनी असा सांगितला आहे: (सत्त्व, रज आणि तम या प्रकृतीच्या तीन गुणांनी पोसलेल्या) गुणप्रवृद्धा (या संसाररूपी पिंपळवृक्षाच्या) तस्य शाखा अधःच ऊर्ध्वःच (वरखाली) प्रसृताः (पसरलेल्या आहेत) (त्यांना शब्द, रूप, गंध रस या विषय़ांचे) विषयप्रवालाः (धुमारे फुटले आहेत). विनोबा भावे यांच्या गीताईमध्ये याचे वर्णन "वरी ही शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥[] असे आले आहे.
वराहमिहिराच्या बृहत्‌-जातकामध्ये (काळ - इसवी सनाचे सहावे शतक) आलेले उल्लेख : -
माणिक्यं तरणेः सुजात्यममलं मुक्ताफलं शीतगोः
माहेयस्यच विद्रुमं मरकतं सौम्यस्य गारुत्मतम्
देवेज्यस्यच पुष्पराजमसुराचार्यस्य वज्रं शनेः
नीलं निर्मलमन्ययोश्च गदिते गोमेदवैदूर्यके

काही अधिक पंक्ती ( स्रोत हवा आहे)
सुवर्णं रजतं मुक्ता राजावर्तं प्रवालकम्‌ ।
रत्‍नपञ्चकमाख्यातं शेषं वस्तु प्रचक्षते ॥
अर्थ : सोने, चांदी, मोती, राजावर्त आणि पोवळे ही पंचरत्ने म्हणून प्रसिद्ध आहेत.

आणखी : माणिक्यं मौक्तिकं वज्रं नीलं मरकतं तथा ।
पञ्चरत्नम् इति प्रोक्तं पाप्मालक्ष्मीविषापहम् ।। (मंथान भैरव लिखित 'आनंदकंद-- २.८.१६४')
गोमेदकं पुष्परागं वैडूर्यमपि विद्रुमम् ।
पञ्चरत्नैः सहैतानि नवरत्नानि निर्दिशेत् ।। (आनंदकंद--२,८.१६५)
अर्थ : माणिक, मोती, हिरा, नीलम आणि मरकत(पन्ना/पाचू) ही पंचरत्ने आणि गोमेद, पुष्कराज, वैडूर्य आणि पोवळे ही चार धरून झालेल्या एकूण ९ रत्नांना, नवरत्ने म्हणतात.

आणखी :
कनकं कुलिशं नीलं पद्मरागंच मौक्तिकम्‌ ।
एतानि पञ्चरत्‍नानि रत्‍नशास्त्रविदो विदुः ॥
अर्थ : सोने, हिरा, नीलम, पद्मराग आणि मोती यांना रत्नशास्त्रात पंचरत्ने म्हणले आहे.

भारतामध्ये प्रवाळाचा उपयोग आयुर्वेदिक औषधे तयार करण्यात होत आला आहे. प्रवाळयुक्त गुलकंद किंवा च्यवनप्राश प्रसिद्ध आहे. प्रवाळाचा उपयोग शरीराला कॅल्शियम मिळावे यासाठी होतो असे समजते.

प्रवाळाची बेटे (coral reef)

[संपादन]

समुद्राच्या तळाशी असलेल्या दगडांवर प्रवाळाची वाढ होते. प्रवाळ जरी वनस्पतीप्रमाणे भासले तरी खरे तर प्रवाळ ही समुद्रात दगडांना चिकटून वाढणाऱ्या सूक्ष्म समुद्री जीवांची वसाहत असते. यातील काही प्रकारचे सूक्ष्म प्रवाळजीव मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम कार्बोनेटचे (CaCO3) उत्सर्जन करतात आणि यामुळे या कठीण अशा स्तराच्या निर्मितीमुळे समुद्रातळाशी जेथे प्रवाळ आढळते तेथे प्रवाळाची विस्तीर्ण बेटे तयार होऊ शकतात, तसेच योग्य तापमान, आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची वाढ उत्तम होते. अशी प्रवाळबेटे समुद्रातील जीवांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. भारतात प्रवाळाची बेटे ही कोकणात तारकर्ली (मालवण), गुजरात मधे द्वारकेजवळ, तसेच लक्षद्वीप (लखदीव) व मालदीव येथे आढळतात असे समजते. याखेरीज भूमध्यसमुद्रात असे प्रवाळ आढळते. जगातील काही ठिकाणच्या प्रवाळबेटांना अलीकडच्या काळात हानी पोचली आहे असे दिसून आले आहे. प्रवाळाची हानी होत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे प्रवाळांचे रंग बदलणे (ब्लीचिंग - coral beaching). ह्याची कारणे समुद्रातील पाण्यात अतिनील किरणांचे वाढलेले प्रमाण, तापमानातील बदल, पाण्यातील धूळ /कचरा यांचे वाढते प्रदूषण अशी दिली जातात.[] ह्या हानीमुळे या बेटांवर अवलंबून असलेल्या सजीव साखळीला (मासे, वनस्पती आणि इतर सागरी जीव) देखील धोका निर्माण होतो.[]

लसण्या (वैदूर्य)

[संपादन]
लसण्या

लसण्या किंवा वैदूर्य (Cat's Eye) (संस्कृत : वैडूर्य)

पुष्कराज

[संपादन]
पुष्कराज

पुष्कराज (Yellow Sapphire)

गोमेद

[संपादन]

गोमेद (इंग्रजी:Hessonite) [ चित्र हवे ]

माणिक

[संपादन]
माणिक

माणिक (इंग्रजी:Ruby)

हिरा

[संपादन]
हिरा

हिरा (इंग्रजी: Diamond) (संस्कृत: हीरक, वज्र, कुलिशम्)

पाचू (Emerald) (संस्कृत : मरकत)

[संपादन]
पाचू

पाचू (इंग्रजी: Emerald) (संस्कृत: मरकत)

नीलम

[संपादन]

नीलम (इंग्रजी:Blue Sapphire) हा रत्नश्रेणीतला खडा समजला जातो.

नीलम

जेव्हा नीलम हा अल्युमिनियम भस्म (ऑक्साइड) (Al2O3) असतो जेव्हा तो लाल रंगाशिवाय इतर रंगाचा असतो. हा खडा नैसर्गिकरीत्या मिळू शकतो अथवा कृत्रिम रितीनेही बनवता येतो. काश्मीर येथे सापडणारा नीलम सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याचप्रमाणे चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, थायलंड, जावा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि काबूल (अफगाणिस्तान) येथेही नीलम सापडतो. हा खडा शनी ग्रहाशी संबंधित आहे अणि खूप कमी कालावधीत आपला शुभ अथवा अशुभ प्रभाव दाखवतो असे समज आहेत.
भारतीय साहित्यातील उल्लेख - (स्रोत हवा आहे).
कनकं कुलिशं नीलं पद्मरागंच मौक्तिकम्‌ ।
एतानि पञ्चरत्‍नानि रत्‍नशास्त्रविदो विदुः ॥१॥

कनकं कुलिशं नीलं पद्मरागोथ मौक्तिकं । एतानि पंचरत्‍नानि कुंभेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहम् । इति पंचरत्‍नानि ।
कलशात पंचरत्‍ने व पैसे घालावेत.--पुण्याहवाचन या विधीमधला एक मंत्र.

नवरत्ने व नवग्रह[१०]

[संपादन]
रत्‍न स्वामी ग्रह
मोती चंद्र
पोवळे मंगळ
लसण्या केतू
पुष्कराज गुरू
गोमेद राहू
माणिक रवि
हिरा शुक्र
पाचू बुध
नीलम शनी

हेही पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2010-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ नोंदी http://query.nytimes.com/mem/archive-free/pdf?_r=1&res=9501E5DC1339EF3ABC4053DFBE668389639EDE
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=35406840 [मृत दुवा]
  4. ^ "संग्रहित प्रत". 2011-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-28 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/scans/MWScan/index.php?sfx=jpg
  6. ^ "संग्रहित प्रत". 2010-06-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-28 रोजी पाहिले.
  7. ^ http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE[permanent dead link]
  8. ^ "संग्रहित प्रत". 2010-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-28 रोजी पाहिले.
  9. ^ उपक्रम: "रत्‍ने, खडे, मणी - एक संकलन Archived 2011-07-22 at the Wayback Machine."
  10. ^ http://www.p-g-a.org/9gems.html
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
नवरत्‍ने
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?