For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for गुफी पेंटल.

गुफी पेंटल

गुफी पेंटल
गुफी पेंटल (२०१०)
जन्म सरबजीत सिंग पेंटल अहलुवालिया[]
४ ऑक्टोबर १९४४ (1944-10-04)
तरन तारन जिल्हा,पंजाब
मृत्यू ५ जून, २०२३ (वय ७८)
अंधेरी, मुंबई
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ १०७८ - २०२३
भाषा पंजाबी
शिक्षण अभियंता
प्रमुख टीव्ही कार्यक्रम महाभारत
वडील गुरुचरण सिंह
पत्नी रेखा पेंटल (मृत्यू १९९३)
अपत्ये हॅरी पेंटल
नातेवाईक पेंटल (भाऊ)
धर्म शीख

गुफी पेंटल (४ ऑक्टोबर, १९४४ - ५ जून, २०२३), मुळनाव सरबजीत सिंग पेंटल अहलुवालिया हे एक भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक होते. गुफी पेंटल हे शिक्षणाने एक अभियंता होते. १९६२ च्या भारत-चीन युद्धात ते भारतीय सेनेत गेले होते. चीनच्या सीमेवर कार्यरत असताना तेथे रामलीला आयोजित केली जात असे, ज्यात गुफी पेंटल हे सीतेची भूमिका करत असत. यातून त्यांना अभिनयाची ओढ लागली. त्यांचे धाकटे बंधू पेंटल यांच्या पाठोपाठ गुफी देखील अभिनय क्षेत्राकडे वळले.[] १९६९ मध्ये मुंबईत आल्यावर, गुफी यांनी मॉडेलिंग, चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक तसेच चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. गुफी यांची बीआर चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेतील शकुनी मामाची भूमिका खूप गाजली होती. स्वतः पेंटल यांनी त्यांची आपल्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट भूमिका आहे असे म्हणले होते.[] महाभारतातील त्यांच्या शकुनी पात्राशी ते इतके जोडले गेले होते की त्यांनी सहारा समय या वृत्तवाहिनीवर शकुनीच्या पात्रात राजकीय चर्चेचा कार्यक्रम सादर केला होता.[]

पेंटल यांनी चैतन्य महाप्रभू या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट १६व्या शतकातील कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटाला रवींद्र जैन यांचे संगीत होते. तर या चित्रपटाचे पवन कुमार हे निर्माते होते.[] २०१० मध्ये महाभारत मालिकेतील सहकलाकार पंकज धीर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील अभिन्नय अ‍ॅक्टिंग अकादमीमध्ये सुविधा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. [][]

मृत्यू

[संपादन]

पेंटल यांचे ५ जून २०२३ रोजी मुंबईतील रुग्णालयात उतार वयातील आजारणामुळे निधन झाले. []

अभिनय सूची

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका
१९७५ रफू चक्कर सलीम
१९७८ दिल्लगी गणेश
१९७८ देस परदेस
१९९४ सुहाग अक्षय कुमारचे मामा
१९९५ मैदान-ए-जंग मामाजी
१९९७ डावा मंगल सिंग, वन पीस काठियावडी घोडो
२००० बदला: गीता मेरा नाम
२००६ घूम (चित्रपट) विजय दीक्षितचे बॉस
२०१३ महाभारत आणि बर्बरीक शकुनी
२०१४ सम्राट आणि कं. दिनेश दास उर्फ डीडी कौटुंबिक वकील

दूरदर्शन

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका चॅनल
१९८६ बहादूर शाह जफर डीडी नॅशनल
१९८८-१९९० महाभारत शकुनी एक अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून डीडी नॅशनल
१९८८-१९९० कानून न्यायमूर्ती रघुनाथ डीडी मेट्रो
१९९२ सौदा डीडी नॅशनल
१९९७-२००१ ओम नमः शिवाय शकुनी डीडी नॅशनल
१९९८-१९९९ अकबर बिरबल मुल्ला दो प्याजा डीडी नॅशनल
२००१ CID (भारतीय टीव्ही मालिका) चंदर भाग १९५, १९६
२००२ श्श्श्श्... कोई है जार्कोस डॉ स्टार प्लस
२००३ मॅजिक मेक-अप बॉक्स वृथारी झी टीव्ही
२०११-२०१२ द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण शकुनी टीव्हीची कल्पना करा
२०१२-२०१३ सौ. कौशिक की पांच बहुं ब्रिजभूषण भल्ला [] झी टीव्ही
२०१३ भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप हुमायून सोनी टीव्ही
२०१६-२०१८ कर्मफळ दाता शनी विश्वकर्मा कलर्स टीव्ही
२०१८ कर्ण संगिनी कृपाचार्य स्टार प्लस
२०१९-२०२३ राधाकृष्ण विश्वकर्मा स्टार भारत
२०२१-२०२२ जय कनिया लाल की विश्वकर्मा स्टार भारत

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Guftagoo with Gufi Paintal". 16 November 2019 रोजी पाहिले – YouTube द्वारे.
  2. ^ "एक्टर बनने से पहले आर्मी में थे 'शकुनि मामा' गूफी पेंटल, चीन के बॉर्डर पर बनते थे सीता". ६ जून २०२३ रोजी पाहिले.
  3. ^ "The other Paintal". २३ ऑक्टोबर २०१२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Sahara Samay: banking on youth". ३ जून २०११ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "Times Music : Shri Chaitanya Mahaprabhu". timesmusic.com. 9 March 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Akshay Kumar inaugurates Pankaj Dheer's acting academy – Abbhinnay". businessofcinema. 9 April 2010. 25 February 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 September 2011 रोजी पाहिले.
  7. ^ "Akshay inaugurates Abbhinnay Acting Academy". The Times of India. 12 April 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 September 2011 रोजी पाहिले.
  8. ^ "Gufi Paintal the Shakuni Mama is sadly no more, he was 79". www.hamaribaat.com (इंग्रजी भाषेत). 2023-06-05 रोजी पाहिले.
  9. ^ "Gufi Paintal in Mrs. Kaushik". The Times of India. २०१३-०१-०३ रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
गुफी पेंटल
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?