For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for एरबाल्टिक.

एरबाल्टिक

एरबाल्टिक
आय.ए.टी.ए.
BT
आय.सी.ए.ओ.
BTI
कॉलसाईन
AIR BALTIC
स्थापना १९९५
हब रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रिगा)
मुख्य शहरे तालिन
फ्रिक्वेंट फ्लायर पिन्स
विमान संख्या २५
गंतव्यस्थाने ६०
पालक कंपनी लात्व्हिया सरकार
मुख्यालय रिगा, लात्व्हिया
पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाकडे निघालेले एरबाल्टिकचे बोइंग ७३७ विमान

एरबाल्टिक (लात्व्हियन: airBaltic) ही बाल्टिक भागातील लात्व्हिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. एरबाल्टिक विमान सेवा एरबाल्टिक महामंडळ चालविते. त्याची धाटणी एरबाल्टिक लटवीन निशांनधारी आहे. ही एक कमी दरात विमानसेवा पुरवणारी कंपनी आहे. रिगा राजधानीजवळ मारूपे महानगर पालीकेत या कंपनीचे मुख्य कार्यालय रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. [] त्याचे मुख्य केंद्र रिगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लात्व्हिया सरकारने ३० नोव्हेंबर २०११ पासून मालकी हक्क प्राप्त केलेले आहेत.

इतिहास

[संपादन]

२८ ऑगस्ट १९९५ रोजी स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्स आणि लात्व्हिया सरकार ह्यांनी एकत्रितपणे या कंपनीची स्थापना केली. १ ऑक्टोबर १९९५ रोजी साब340 विमान रिगा येथे पोहचले आणि संध्याकाळी ते एरबाल्टिकचे पहिले उड्डाण झाले. []

सन १९९६ मध्ये या कंपनीचे पहिले Avro आरजे70 पाठविले आणि एरबाल्टिक SAS क्लबचे सभासद झाले. सन १९९७ मध्ये मालवाहातूक विभाग चालू केला आणि १९९८ मध्ये या कंपनी ने पहिले फोक्कर 50 विमान पाठविले. या दत्तक वायु यानाचा रंग सफेद आणि विमानाचे मुख्य भागावर निळ्या श्याइणे कंपनीचे नाव लिहिलेले होते. त्यांचा “B” लोगो अगदी टुमदार शैलीत निळ्या रंगात ठळकपने होता.त्याचीच पुनरावृत्ती विमानाचे अगदी सेवटचे भागावर देखील केलेली होती.

सन १९९९ मध्ये पूर्वी मर्यादित जबाबदारी असणारी ही एरबाल्टिक सान १९९९ मध्ये सार्वजनिक भागीदारी कंपनी झाली.त्याच्या सर्व Saab 340sची जागा फोक्कर Saab 350s ने घेतली. सप्टेंबर पासून या कंपनी ने युरोपचे उच्च प्रतीचे धर्तीवर विमान सेवा चालू केली. एरबाल्टिक ने नवीन युनिफॉर्म आणि रिगा विमानतळावर मालवाहातूक केंद्र उभारून नवीन मीलींनियमचे स्वागत केले. सन २००३ मध्ये एरबाल्टिकचे विमान आरमारात बोइंग 737-500 समविष्ट झाले.

१ जून २००४ लिथुएनियाची राजधानी व्हिल्नियस व इतर ५ ठिकाणी विमान सेवेचा प्रारंभ केला. ऑक्टोबर २००४ मध्ये Air Balticची AirBaltic असी निशाणी झाली. त्यांचे सर्व विमान तांड्याचा रंग सफेद आहे. विमानाच्या दर्शनी मध्यभागी AirBaltic.com प्रदर्शित केले आणि Baltic हा शब्द पाठीमागील निळ्या भागावर खालच्या बाजूस परत लिहिला. डिसेंबर 2006 मध्ये पहिले बोइंग 737-300 यांचेकडे आले आणि त्याचा सर्व चेहरा मोहरा अगदी पंखसह बदलला. जुलै २००७ मध्ये तपासणी पद्दत ऑनलाइन सुरू केली.बाल्टिक राष्ट्रातील ही पहिली ऑनलाइन पद्दत ठरली. सन २००८ मध्ये दोन लांबलचक बोइंग 757 एरबाल्टिकचे ताफ्यात सामील झाली. १० मार्च २००८ रोजी पुढील ३ वर्षात आम्ही नवीन वायु याने ताब्यात घेवू आणि सर्वात ज्यास्त विमान तांडा असणारी कंपनी असा अनुभव देवू असी एरबाल्टिक ने घोषणा केली. नवीन भर ही क्यू400 आधुनिक तंत्रज्ञानाची वायु याने असतील.[]

एरबाल्टिकची SAS बरोबर परिनाकारक साखळी आहे. त्यांची ४७.२% या कंपनीत मालकी आहे. यांनी SAS केंद्रात कोपनहेगन, ऑस्लो, स्टॉकहोम येथे नियमित उड्डाण सेवा आहे. पूर्वी वैमानिकसाठी SAS युरोबोनस विमान उड्डाण कार्यक्रम राबवत होती. पण आता त्यांचा PINS हा स्वतःहाचा आहे. एरबाल्टिकची कांही उत्पादने SAS बरोबर सहभागी होतात. एरबाल्टिक इतर कोणत्याही सहयोगी विमान कंपनीची सदश्य नाही पण ज्या कांही नावाजलेल्या सहयोगी आणि इतर विमान कंपन्या आहेत त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय विमान सेवा नियमावलीनुसार आवश्यक ते करार केलेले आहेत.

एरबाल्टिकचे द्वितीय श्रेणी केंद्र विल्नियस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि लेंनार्ट मेरी तल्लीन्न विमानतळावर आहेत.यांचे बहुतांश हवाई मार्ग एस्तोंनियन कंझुमर प्रोटेक्शन विभागाने केलेल्या तक्रारीवरून नुकतेच रद्द केलेले आहेत.[]


एरबाल्टिक मधील SASची गुंतवणूक विक्री

[संपादन]

जानेवरी २००९ मध्ये SAS ने एरबाल्टिक मधील असलेली ४७.२% भाग बल्टिजस अवियकीजस सिस्टेमस लि. (BAS) यांना १४ मिल्लियन लाट्स या किमतीला विकले. BASचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बेर्टोल्ट फ्लिक्क यांची या खरेदी केलेल्या भागाची मालकी होती. डिसेंबर २०१० नंतर त्यातील ५०% त्यांनी बहामास येथे नोंदणी झालेले तौरूस ॲसेट मॅनेजमेंट फंड लिमिटेड कडे वर्ग केले.

सन 2011 पासूनची आर्थिक आडचण

[संपादन]

भाग भांडवलात ६० मिल्लीयन पेक्षा जादा लाट्स तूट आहे आणि तोटा गगनाला भिडला आहे असे एरबाल्टिक ने ऑगस्ट २०११ मध्ये निवेदन केले.[] त्यामुळे आर्थिक बाबीचा चालू असलेला सट्टेबाजार त्रासदायक झालेला आहे आणि लज्जास्पद राजकीय हस्तक्षेप २०११ मध्ये वर्षभर चालू आहे.सप्टेंबर २०११ चे मध्यंतरी एरबाल्टिक ने साधारण आर्धे कर्माच्याऱ्यांना तात्पुरते कमी करणे आणि ७०० विमान उड्डाणे रद्द करणेची योजना घोषित केली. आणि इच्छुक गुंतवणूक दारासाठी ९.६ मिल्लियन युरो की ज्यात ५९११० जादा भागांचा समावेश होता त्याची घोषणा केली.लटविय सरकारने आणि BAS ने साधारण १०० मिल्लियन लाट्स गुंतवणूक करण्याचे मान्य केले त्यामुळे ४ ऑक्टोबर २०११ रोजी कंपनीने केलेले नियोजन रद्द केले.

बेर्टोल्ट फ्लिक दीर्घ काळं अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. झालेल्या करारानुसार ते दूर झाले आणि त्याची जागा हंगेरीयन कंपनी मालेवचे जुने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) मार्टिन गौस हे या विमान कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) बनले.

२२ जुलै २०१४ रोजी एरबाल्टिक विमान कंपनी ऑनलाइन बुकिंग साठी बीटकॉईन स्वीकार करणारी पहिली कंपनी ठरली.[]

फ्लीट (विमान संच)

[संपादन]
प्रकार विमान संख्या.
बोइंग 737-300
बोइंग 737-500
बोंबर्डीर C S 400 (२०१६ साली सेवेत येणार) १३
बोंबर्डीर डॅश 8 Q400 १२
एकूण सेवेत २४

विमानातील सेवा

[संपादन]

विमानात खरेदी करून खान पाण करण्याची सुविधा आहे.

अवॉर्ड ( बक्षीस )

[संपादन]

युरोप मधील सर्वात ज्यास्त नवीन विमान मार्ग शोधणारी कंपनी म्हणून ANNIES अवॉर्ड एरबाल्टिकला मिळाला.[] कंपनीला २०१४ आणि २०१५ मध्ये जगातील सर्वात वक्तशीर उड्डाणे घेणारे हवाई परिवहन असल्याने OAG करून सन्मानित केले गेले आहे.[]

घटना आणि अपघात

[संपादन]

८ ऑगस्ट २०१५ रोजी वैमानिक, सहकारी वैमानिक आणि ५ पैकी २ परसर्स एरबाल्टिकचे नियमित विमान ऑस्लो एरपोर्ट गर्देर्मोएन ते च्यायना आंतरराष्ट्रीय एरपोर्ट कडे जाणाऱ्या विमानात त्याच विमानाचे वैमानिक, सहवैमाणिक आणि ५ पैकी २ परसर उच्च प्रतीचे अल्कोहोल कॅन घेऊन विमानात प्रवेश करताना कैद केले. ही माहिती एका माहीत नसलेल्या कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली दुसरे कर्मचारी येईपर्यंत विमानाचे उड्डाण खूप काळं थांबले. कैद केलेले कर्मचारी तात्पुरते कामावरून कमी केले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "एरबाल्टिक एर लाईनची आंतरराष्ट्रीय कार्यालये आणि प्रतिनिधी".
  2. ^ "एरबाल्टिक कंपनीचा इतिहास".
  3. ^ "एरबाल्टिक विमान सेवा". 2019-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-07 रोजी पाहिले.
  4. ^ "एस्टोनिअन्सला ऐरबाल्टिक बाबतीत उड्डाण रद्द बद्दल चेतावणी देण्यात आली आहे".
  5. ^ "एरबाल्टिकला भव्य गुंतवणूकची गरज आहे".
  6. ^ "एरबाल्टिक बीटकॉईन स्वीकार करणारी पहिली विमानसेवा कंपनी ठरली".
  7. ^ "एरबाल्टिकला युरो अन्नीएस पुरस्कार प्राप्त".
  8. ^ "एरबाल्टिकला जगातील सर्वात वक्तशीर उड्डाणे घेणारे हवाई परिवहन पुरस्कार प्राप्त".

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
एरबाल्टिक
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?