For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे).

अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)

अभियांत्रिकी महाविद्यालय
ब्रीदवाक्य Strength Truth Endurance
पदवी २३००
स्नातकोत्तर ७००
Campus शहरी, ३६ एकर



अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ (पूर्वीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इ.स. १८५४ साली स्थापन झालेले हे महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, गिंडी (इ.स. १७९४) व भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुडकी (इ.स. १८४७) यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. विद्यालयाच्या अभ्यास पध्तीना १९५० साली "पूना मॉडेल" म्हणले जायचे.

इतिहास

[संपादन]
अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे

भारतीय उपखंडातील तांत्रिक गरजा भागवण्यासाठी १८५४ साली इंग्रजांनी 'Poona Engineering Class and Mechanical School' या नावाने हे अभियांत्रिकी महाविद्यालय चालू केले होते. त्यावेळी भारतात इमारती, पूल, धरण, कालवे, रेल्वेवे इत्यादी सार्वजनिक सोयींच्या बांधकामासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हेच या महाविद्यालयाचे प्रमुख कार्य होते. नंतर काही काळासाठी महाविद्यालयाचे नाव 'Poona Civil Engineering College' असे करण्यात आले होते. शेवटी इ.स. १९११ साली या महाविद्यालयाचे 'College of Engineering, Poona' असे नामकरण करण्यात आले.

सुरुवातीस, मुंबई विश्वविद्यालयाशी संलग्न असताना, येथील विद्यार्थ्यांना 'Licentiate in Civil Engineering' (LCE) हे प्रमाणपत्र मिळत असे. नंतर हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पदवीत बदलला गेला व इ.स. १९१२ साली पहिली 'Bachelor of Engineering' (B.E.)ची तुकडी बाहेर पडली. त्यावेळी हा अभ्यासक्रम ३ वर्षांचा असे. इ.स. १९६७-इ.स. १९६८च्या सुमारास हा अभ्यासक्रम ४ वर्षांच्या सहामाही स्वरूपाच्या अभ्यासक्रमात बदलला गेला.

इ.स. २००३ साली या अभियांत्रिकी महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण स्वायत्तता मिळाली. परिणामी, महाविद्यालयाला स्वतःचा अभ्यासक्रम ठरवण्याचे व आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे स्वातंत्र्य मिळाले. महाविद्यालय आता पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा बदल आहे. त्यानंतरच्या वर्षांत व्यवस्थापन व शैक्षणिक रणनीत्यांमध्ये बरेच परिवर्तन घडून आलेले दिसते. परिणामी विद्यार्थी नव्यानव्या कॢप्तिपूर्ण व कल्पक उपक्रमांमध्ये रस घेऊ लागले आहेत. स्वायत्ततेमुळे मिळालेला वाढीव लवचीकपणा व काळानुरूप बदलत्या औद्योगिक गरजांशी सुसंगत असलेल्या गतिशीलतेने बदलणाऱ्या अभ्यासक्रमामुळे महाविद्यालयात समाधानाचे वातावरण आहे.

भारतरत्न श्री मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते.

विभाग

[संपादन]

महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकीच्या खालील शाखांमध्ये बी.टेक. (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) ही पदवी मिळवता येते. स्वायत्तता मिळण्याआधी बी.ई. (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) ही पदवी मिळत असे. (शाखांच्या नावासमोर कंसात ती शाखा ज्या साली सुरू करण्यात आली, ते सालही नमूद केले आहे.)

धातुशास्त्र अभियांत्रिकी विभाग (इ.स. १९४८)

[संपादन]

विद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी विभाग (इ.स. १९५६)

[संपादन]

उपयोजित विज्ञान विभाग (इ.स. १९९०)

[संपादन]

येथे रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र, उपयोजित जीवशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, नीतिशास्त्र, इंग्रजी, संवाद कौशल्य या विषयाचे अध्यापन केले जाते.

विभागातील प्राध्यापकः

  1. डॉ. जयंत खेर
  2. डॉ. मनिषा खळदकर
  3. डॉ. महेश शिंदीकर

माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभाग (इ.स. २००१)

[संपादन]

वादविवाद मंडळ

[संपादन]

सी. ओ . ई .पी . वादविवाद मंडळ पुण्यातील प्रतिष्ठीत वाद मंडळांपैकी एक आहे. या मंडळाचे दोन विभाग आहेत- इंग्रजी विभाग आणि मराठी विभाग. मंडळातील सभासदांची निवड शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला निवडप्रक्रियेमार्फत होते. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील विविध स्पर्धा गाजवलेले वक्ते या मंडळाने महाराष्ट्राला दिले आहेत. विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याव्यतिरिक्त या मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वार्षिक 'सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व, वादविवाद व PPT  सादरीकरण स्पर्धा' वादविवाद मंडळातर्फे आयोजित केली जाते. ही स्पर्धा २००१ सालापासुन आयोजित केली जाते व महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. याबरोबरच महाविद्यालयामध्ये 'संवाद तरुणाईशी', 'शब्द', 'सीओईपीवर बोलू काही' असे विविधांगी कार्यक्रम आयोजित केले जातात.

बोट क्लब

[संपादन]

पुण्यातील या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इ.स.१९२८पासून चाललेला एक बोट क्लब आहे. १२०हून अधिक होड्या या बोट क्लबात आहेत. वल्ह्यांनी किंवा पॅडल मारून चालवायच्या कायक, कनू, सिंगल स्कल, डबल स्कल, शेल पेर, शेल फोर, पंट, एटर(आठजणांची होडी) इत्यादी बोटी वापरात आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमधे महविद्यालयाचा सहभाग असतो. दरवर्षी, CoEPच्या बोट क्लब द्वारे रेगाटा, हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

मुक्तस्रोत गट

[संपादन]

CoEP's Free Software Users Group(CoFSUG) हा विद्यार्थ्यांनी सुरू केलेला एक गट आहे. मुक्त सॉफ्टवेअरचा प्रचार करणे हा या गटाचा उद्देश आहे. हा एक Google गट आहे आणि तो सर्वांसाठी उपलब्ध आहे.

इमारत

[संपादन]

महाविद्यालयाची इमारत पुण्यातील एक वारसा स्थळ म्हणून गणली जाते. इमारतीची स्थापत्यशैली कोणत्याही पारंपारिक शैलीला धरून नाही, तिच्यावर थोडा व्हिक्टोरीयन प्रभाव जाणवत असला तरी त्याची शैली ही कायमच स्वतंत्र मानली गेली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?