अनिसा मोहम्मद
अनिसा मोहम्मद (७ ऑगस्ट, इ.स. १९८८:सांग्रे ग्रांदे, त्रिनिदाद - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[१]
ही २६ जुलै, २००३ रोजी जपानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली. तेव्हा ती चौदा वर्षांची होती.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.